महाराष्ट्राच्या शिरेपेचात मानाचा तुरा रोवणारी मंगळवेढा तालुक्याची सुवर्णकन्या भक्ती घुले. 

महाराष्ट्राच्या शिरेपेचात मानाचा तुरा रोवणारी मंगळवेढा तालुक्याची सुवर्णकन्या भक्ती घुले. 

पंढरपूर/ प्रतिनिधी-मंगळवेढा तालुक्याच्या क्रीडा क्षेत्रात ज्या शाळेचे आदराने नाव घेतले जाते ती शाळा म्हणजे इंग्लिश स्कूल मंगळवेढा. या प्रशालेची विद्यार्थिनी भक्ती दिगंबर घुले सेपक टकरा खेळात उत्तुंग भरारी घेत मंगळवेढा तालुक्याचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात चमकविले आहे.

        नागपूर या ठिकाणी पहिल्या मिनी ऑलिंपिक स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेत सोलापूर जिल्ह्याला तिने तीन सुवर्णपदके मिळवून दिली. त्याबरोबरच बिहार (पटना )येथे झालेल्या राष्ट्रीय सेपक टकरा स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. भोपाळ या ठिकाणी राष्ट्रीय शटल कॉक स्पर्धा पार पडली या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला दोन सुवर्णपदके मिळवून दिली.

    काही महिन्यापूर्वी कर्नाटक येथील  दावणगिरी  तेलंगणा, आंध्र प्रदेश, या राज्यात  राष्ट्रीय सेपक टकरा स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत तिने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले.

       त्याबरोबरच पुढील महिन्यात नागालँड या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय शालेय सेपक टकरा स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचे कर्णधार म्हणून तिची निवड झाली आहे. अशी ही मंगळवेढ्याची सुवर्णकन्या महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट सेपक टकरा खेळाडू आहे.