माढा विधानसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिजीत पाटील यांनीही आपल्या कुटुंबासमवेत बजावला पवित्र मतदानाचा अधिकार
पंढरपूर /प्रतिनिधी -विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तसेच माढा विधानसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिजीत पाटील यांनी पंढरपूर तालुक्यातील मौजे देगाव या ठिकाणी आपल्या गावातील ग्रामदैवताचे आशीर्वाद घेऊन थोरामोठ्यांचे आशीर्वाद घेऊन कुटुंबासमवेत मतदानाचा अधिकार बजावल्याचे दिसून आले त्यावेळेस अभिजीत पाटील यांच्यासह जयश्री पाटील सुमित्रा पाटील रेशमी पाटील अंजली पाटील अनुपमा पाटील अनुराधा पाटील स्वाती पाटील इत्यादींसह गावातील बहुसंख्येने नागरिक उपस्थित असलेले पहावयास मिळत होते
यावेळेस माध्यमांशी बोलताना अभिजीत पाटील म्हणाले की
माझ्या आयुष्यातला एक सुवर्णक्षण माझ्या आई-वडिलांचे आशीर्वाद माढा विधानसभा मतदारसंघातील जनतेचे माझ्यावर असणारे प्रेम शरद पवार यांचे माझ्यावर असलेले प्रेम जिल्ह्याचे नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचा माझ्यावर असणारा विश्वास माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील या सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या आशीर्वादामुळे मला माढा तालुक्यातील जनता प्रचंड बहुमताने निवडून देईल असा विश्वास त्यांनी आपल्या बोलण्यातून व्यक्त केला