उध्दवजी ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी
अपंग विद्यार्थांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करत रणजित बागल यांचेकडून उध्दवजी ठाकरेंचा वाढदिवस साजरा
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचे वाढदिवसानिमित्त युवासेनेचे राज्याचे सडेतोड वक्ते रणजित बागल यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम हे दरवर्षी राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणुन वाढदिवसाचे औचित्य साधून श्री. बागल यांचे वतिने काॅलेज चौक बायपास पंढरपूर येथिल 'नवजीवन अपंग शाळा' मधिल दिव्यांग विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले..
या शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप कार्यक्रम प्रसंगी बोलताना श्री बागल म्हणाले की, "पक्षप्रमुख उध्दवसाहेब ठाकरे हे सर्वसमावेशक व सर्वाभिमुख असे नेतृत्व आहेत, त्यांच्या वाढदिवसानिमित्त निरोगी व उदंड आयुष्य लाभावे या शिवसैनिकांकडून सदिच्छा आहेत व या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी या उपक्रमातुन आम्ही जपत आहोत" असे ते म्हणाले..
पूढे बोलताना श्री.बागल यांनी "समाजातील सर्वच घटकांसाठी शिवसेनेच्या माध्यमातून हिताचे कार्य केले गेले पाहिजे ही वंदनीय हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेबांची शिकवण पक्षप्रमुख उध्दवसाहेब आजची अविरतपणे जनमाणसात राबवत आहेत, गरीब व गरजूंना सहाय्य करणे हे कर्तव्य आहे ते शिवसैनिकांनी पार पाडले पाहिजे अशा कायम सुचना उध्दवजींच्या असतात. हे ध्यानात घेऊन आम्ही आजचा हा उपक्रम घेत आहोत" असे सांगितले..
सुभाष भोसले युवासेना सांगोला तालुकाप्रमुख,शंकर मेटकरी विधानसभा समन्वयक शिवसेना, समाधान गोरे उपतालुकाप्रमुख पंढरपूर युवासेना,महेश कांबळे शिवदुत पंढरपूर मंगळवेढा विधानसभा,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस श.प.पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रणव गायकवाड,युवासेना समन्वयक स्वप्निल गावडे,विठ्ठल भोसले,हर्षद मोरे,विरेंद्र शेंडे,औदुंबर चव्हाण,गणेश जाधव, विलास कांबळे यांचेसह शिवसेना पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक उपस्थित होते.