समाजसेवेचा घेतला एकच ध्यास पण निसर्गाचा होऊ देऊ नका ऱ्हास - प्रियंका (ताई) परांडे
युवती सेनेच्या जिल्हा प्रमुख यांच्या हस्ते सुस्ते व तुंगत येथे वृक्षारोपण
पंढरपूर /प्रतिन
महाराष्ट्राचे गतिमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पर्यावरण विषयक कार्यबाबत व नुकतेच पार पडलेल्या आषाढी वारीतील पर्यावरण जागृती मोहीम पाहता, यावरती प्रेरित होऊन सोलापूर जिल्हा युवती सेनेच्या जिल्हाप्रमुख प्रियांका परांडे यांच्या हस्ते तुंगत आणि सुस्ते येथे वृक्षारोपण करण्यात आले.
या करण्यात आलेल्या वृक्षारोपणमध्ये नारळ, आंबा, चिंच तसेच इतरवली देणारे वृक्ष असे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी मोती सेनेच्या जिल्हाप्रमुख प्रियंका परांडे यांनी आपले पर्यावरण विषयक होणारे फायदे तोटे यावर चर्चा केली. यामध्ये पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी, या पद्धतीने प्लास्टिक वापरावरती कंट्रोल करणे गरजेचे आहे. त्याच पद्धतीने योग्य मान्सूनसाठी वृक्षारोपण करणे गरजेचे आहे. सांगितले.
यावेळी गणेश चव्हाण सुस्ते, रणजीत जगताप तारापूर, लियाकत मुलानी ग्रामपंचायत सदस्य तारापूर, रमेश आव्हाड तारापूर, एडवोकेट समाधान गाडे तारापूर,प्रदीप परांडे,अनंता चव्हाण, महेश चव्हाण इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.
- संपादक -
नवक्रांती न्यूज
अरुण जाधव
9730775373