श्री नागनाथ मूकबधिर विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा 

श्री नागनाथ मूकबधिर विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा 

पंढरपूर /प्रतिनिधी- श्री नागनाथ मूकबधिर निवासी विद्यालय बाभुळगाव तालुका पंढरपूर येथे 76 वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गौतम विद्यालय पंढरपूर येथील माजी प्राचार्य श्री ढवळे सर हे होते तर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा श्री अभिजीत आबा पाटील यांचे विश्वासू सहकारी माननीय श्री नितीन दादा सरडे ऍड श्री सिद्धेश्वर चव्हाण बाभुळगावचे माजी सरपंच जीवन काका पाटील दूध संघाचे चेअरमन गणेश गांडुळे संत दामाजी अपंग सेवा मंडळाचे सचिव चित्रसेन पाथरूट सर समाधान आदमी ले अनिल माळी निलेश राजगुरू बोंगे आदी मान्यवर उपस्थित होते 

         प्रारंभी संत दामाजी अपंग सेवा मंडळाचे संस्थापक कै. काशिनाथ पाथरूट गुरुजी व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन श्री ढवळे सर यांच्या हस्ते करण्यात आले मा श्री नितीन दादा सरडे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यानंतर सामूहिक ध्वजगीत व राष्ट्रगीत गायले गेले तसेच विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आकर्षक कवायतीचे सादरीकरण केले वरील सर्व मान्यवरांचे हस्ते शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना गणवेश चे वाटप करण्यात आले या विद्यालयातील सर्व मुलांना ह भ प दिलीप महाराज इसादकर यांचे कडून मिष्ठान्न भोजन देण्यात आले तसेच वरील सर्व मान्यवरांच्या हस्ते शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना गणवेशाची वाटप करण्यात आले विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री भोसले सर यांनी प्रास्ताविक करून शाळेची माहिती सांगितली यावेळी नितीन सरडे दादा संस्थेचे सचिव चित्रसेन पाथरूट सर सिद्धेश्वर चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी नितीन सरडे दादा यांनी या संस्थेस व शाळेला कोणतेही मदत लागल्यास मदत करण्याचे अभिवचन दिले तसे सिद्धेश्वर चव्हाण यांनीही या शाळेला कोणतेही माझ्या परीने सहकार्य करण्याचे अभिवचन दिले कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री ढवळे सर यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व समजावून सांगितले विद्यालय व शिक्षकांचे कौतुक केले यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन श्री खरसडे यांनी केले तर आभार गुज्जलवार यांनी मानले