स्वेरीतील एमबीएच्या विद्यार्थ्यांचा ‘इन्व्हेस्टीसिया २०२४’ या राष्ट्रीय परिषदेत सहभाग

स्वेरीतील एमबीएच्या विद्यार्थ्यांचा ‘इन्व्हेस्टीसिया २०२४’ या राष्ट्रीय परिषदेत सहभाग

पंढरपूर- मुंबई मधील बीएसई तथा ‘बॉम्बे स्टॉक एक्सचेंज’ या ठिकाणी झालेल्या ‘इन्व्हेस्टीसिया २०२४’ या एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेत स्वेरीच्या एमबीए विभागातील एकूण १० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. 

         दि. १४ ऑक्टोबर ते दि.२० ऑक्टोबर २०२४ दरम्यान बीएसई (बॉम्बे स्टॉक एक्सचेंज) मध्ये वर्ल्ड इन्व्हेस्टर वीक निमित्ताने आयोजित केलेल्या एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेत स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व विभागप्रमुख डॉ.कमल गलानी यांच्या नेतृत्वाखाली स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूरच्या एमबीए विभागात दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणारे प्रशांत हरिदास गायकवाड, सुरज अर्जुन पाटोळे, सुयश सुभाष पावले, मनोज बापूसाहेब शिंदे, महेश संजय घाडगे, प्रज्वल नागनाथ मंठाळकर, सोहन सिद्धेश्वर म्हमाणे, दीपक दत्तू नाईकननवरे, आदित्य सतीश पाचोरे व ऋषिकेश श्यामसुंदर कोरडे या १० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. आशियातील सर्वात जुनी शेअर बाजारपेठ असलेल्या बीएसई मधील ही राष्ट्रीय परिषद विद्यार्थ्यांसाठी महत्वाची ठरली. या राष्ट्रीय परिषदेत एन.आय.एस.एम.चे संचालक शशी कृष्णन, सेबीचे सदस्य अनंत नारायण, बीएसईचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदरराम राममूर्ती, एमएसई चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी लतिका कुंडू, सीडीएसएलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नेहल वोरा, सेबी– गुंतवणूकदार जागरूकता विभागाच्या महाव्यवस्थापिका दीप्ती अग्रवाल आणि सेबी व एन.आय.एस.एम.चे मुख्य महाव्यवस्थापक दीपक त्रिवेदी, यांसारख्या अभ्यासू व्यक्तिमत्त्वांचे बहुमोल मार्गदर्शन मिळाले. या राष्ट्रीय परिषदेत सहभागी झाल्याबद्धल विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे आणि महाविद्यालयासाठी स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरींग हे या परिषदेत सहभाग नोंदवणारे प्रादेशिक स्तरावरील एकमेव महाविद्यालय आहे, हे विशेष!