छत्रपती शिवाजी महाराज महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न.

छत्रपती शिवाजी महाराज महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न.

पंढरपूर/शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी तावशी तालुका पंढरपूर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिराचेआयोजन करण्यात आले होते.

यावेळी तावशी गावातील व पंचक्रोशीतील गरजवंतांना मोठा दिलासा मिळाल्याचे दिसून येत होते .यावेळी शेटफळ, तनाळी, सिद्धेवाडी , एकलासपूर, शिरगाव, चिचुंबे या गावामधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असलेले पाहावयास मिळाले आणि या योजनेचे सर्वसामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केल्याचे पहावयास मिळत होते .विविध योजनेचा लाभ देण्यासाठी मौजे तावशी येथे तहसील कार्यालय पंढरपूर तालुका प्रशासनातर्फे छत्रपती शिवाजी महाराज महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरासाठी आमदार आमदार श्री समाधान दादा आवताडे, सदस्य पंढरपूर मतदार संघ मा. श्री.सचिन इथापे, उपविभागीय अधिकारी पंढरपूर विभाग पंढरपूर ,कार्यक्रमाचे अध्यक्ष:- श्री सचिन लंगोटे, तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, सदर कार्यक्रमास खालील प्रमाणे अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.श्री मोरे, तालुका कृषी अधिकारी श्री डॉ.बोधले, तालुका आरोग्य अधिकारी,श्री. विकास काळोखे,सहाय्यक गट विकास अधिकारी श्री दादा गावंदरे, सहा. महसूल अधिकारी, श्री. जे. एम. कुंभार सहा. महसूल अधिकारी श्री. आनंद सोनवणे, ग्राम महसूल अधिकारी 

मंडळ अधिकारी खर्डी व कासेगाव तसेच या मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसेवक ,पोलीस पाटील, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, इत्यादी ग्राम स्तरावरील सर्व विभागाचे कर्मचारी यांनी उपस्थित राहून कामकाज केले 

          सदर वेळी खालील प्रमाणे लाभ वाटप करण्यात आले.

1. जातीचा दाखला प्रमाणपत्र -103

2. नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र 87

3. रहिवासी प्रमाणपत्र - 96

4. उत्पन्नाचा दाखला - 167

5. रेशन कार्ड -27

6. संजय गांधी व श्रावण बाळ मंजूर लाभार्थी- 3

8. आरोग्य विभाग-276 (आयुष्यमान भारत कार्ड-10, उच्च रक्तदाब तपासणी- 46, शुगर तपासणी-35, हिमोग्लोबिन तपासणी-31,डोळे तपासणी-60, प्रथमिक औषधोपचार-94)

9. कृषि विभाग 12 (ठिबक सिंचन-1, फळबाग-3, शेत तळे - 1, ट्रॅक्टर -1, रोटा वेटर-1, अस्तरीकरण-1, पावर टिलर -1)

10. गणवेश वाटप - 10

11. ग्रामपंचायत कडील लाभ - 9

असे एकूण 790 लाभार्थीना लाभ देण्यात आला आहे.