दिव्यांगाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत श्री नागनाथ मूकबधिर विद्यालय बाबुळगाव या विद्यालयातील विद्यार्थी चिरंजीव सागर प्रकाश गोरे प्रथम..
.
पंढरपूर/ प्रतिनिधी - दिव्यांग कल्याण विभाग महाराष्ट्र शासन, दिव्यांग कल्याण आयुक्तालय क्रीडा संचनालय पुणे स्वर्गीय प्रभाकरराव दटके स्मृती सेवा संस्था नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा नागपूर येथे 22 23 24 मार्च रोजी पार पडल्या. या स्पर्धेमध्ये श्री नागनाथ मूकबधिर विद्यालयाचा विद्यार्थी चिरंजीव सागर प्रकाश गोरे याने 17ते 21 या वयोगटामध्ये 200 मीटर धावणे या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकावले.
नागपूर येथे झालेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडवणीस साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले. राज्यभरातील सर्वच प्रवर्गातून जवळजवळ 2500 स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.
श्री नागनाथ मूकबधिर विद्यालयाचा खेळाडू सागर याने 200 मीटर धावणे या क्रीडा प्रकारात उत्तम कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. त्याची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत निवड झाली आहे.
सागरच्या या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सुशीला पाथरूट मॅडम संस्थेचे सचिव श्री चित्रसेन पाथरूट सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री नागनाथ पाथरूट सर यांनी अभिनंदन केले. व राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
सागर याच्या यशाबद्दल विद्यालयात त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री मधुकर भोसले सर मंगळवेढा मूकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सुरवसे सर श्री मेघा श्याम सुरवसे सर, संस्थेचे प्रशासक श्री महादेव खरसडे सर सह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
चि. सागर याला विद्यालयाचे क्रीडाशिक्षक श्री राजेंद्र बाबर सर व श्री अर्जुन नंदुरे सर यांचे मार्गदर्शन लाभले.