कोणताही राजकीय वारसा नसतानाहीराजू खरे यांनी विकासाची गंगा आणली मोहोळकरांच्या दारी.

कोणताही राजकीय वारसा नसतानाहीराजू खरे यांनी विकासाची गंगा आणली मोहोळकरांच्या दारी.

पंढरपूर /प्रतिनिधी आज आपण पाहतो मला निवडून द्या मग तुमच्या भागाचा विकास करतो अशी म्हणणारी नेते मंडळी आज आपणास पहावयास मिळतील. परंतु राजू खरे या नावाच विकासाचे वादळ मोहोळ तालुक्यात गेली कित्येक वर्ष झालं गोरगरिबासाठी शेतकऱ्यांसाठी रात्रीचा दिवस करताय ते वादळ म्हणजे राजू खरे आधी केले नंतर सांगितले या म्हणीप्रमाणे अगोदर लोकांच्या अडीअडचणी सोडवणे जनमानसात आपल्या कामाचा ठसा उमटवणे असंच काहीसं काम राजू खरे यांच्या माध्यमातून मोहोळ तालुक्यामध्ये व पंढरपूर तालुक्यातील मोहोळ विधानसभा मतदारसंघांमध्ये समाविष्ट असलेल्या पंढरपूर तालुक्यातील गावामध्ये दिसून येत आहे

            जनसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद अंगीकारून त्यांनी जनतेच्या अडीअडचणी काय आहेत व त्या सोडवण्यासाठी काय करावे लागेल असे विचार कायम त्यांच्या अंगी असल्याचे दिसून येते त्यांनी केलेली विकास कामे ही मोहोळ तालुका व मोहोळ मतदार संघात समाविष्ट असणाऱ्या गावातील जनता कधीच विसरणार नाही 42 अंश टेंपरेचर उन्हाळ्याचे दिवस असताना टँकरच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची सोय करून मोहोळ व परिसरातील वाड्या वस्त्यावर खेडोपाडी लोकांची तहान  भागविण्याचे काम राजू खरे यांनी केल

              गेली कित्येक वर्ष लोकांना येण्या जाण्यासाठी रस्त्याची सोय नव्हती त्यांनी तेही काम वेगवेगळ्या फंडाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविले त्यामुळे मोहोळ तालुक्यातील सर्वसामान्य लोकांमध्ये आपल्या कामाचा वेगळाच ठसा त्यांनी दाखवून दिला त्यामुळेच मोहोळ तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये राजू खरे यांच्या बद्दल असणारे प्रेम त्यांच्या तेथील लोकांच्या बोलण्यातून दिसून येते

आज नेतेमंडळी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जनतेला आश्वासने देत आहेत आपण जर मला निवडून दिले तर मी आपल्या भागाचा विकास करतो अशीही नेते मडळ कडून लोकांना आश्वासने दिल्याचे पहावयास मिळते विकास होतो की नाही हे जनतेलाही चांगले ठाऊक असते.

              परंतु राजू खरे या गोष्टीला अपवाद म्हणावे लागतील अगोदर केले नंतर सांगितले याप्रमाणे त्यांनी कोणताही राजकीय वारसा नसतानाही  विकासाची गंगा मोहोळ तालुक्यातील खेड्यापाड्यापर्यंत पोहोचविण्याचे काम केले म्हणूनच तेथील सर्वसामान्य नागरिक राजू खरे यांच्या कामावर खुश असल्याचे दिसून येत आहे भविष्यात आपल्या तालुक्याचा लोकप्रतिनिधी राजू खरे हेच असावेतअशी चर्चा नागरिकातून होत असल्याचे दिसून येत आहे.