मा.अनिल सावंत यांच्या प्रचारार्थ जयंत पाटील यांच्या सभेसाठी पंढरपूर व मतदार संघातील लोकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती

मा.अनिल सावंत यांच्या प्रचारार्थ जयंत पाटील यांच्या सभेसाठी पंढरपूर व  मतदार संघातील लोकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती

पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत यांची आज 15 नोव्हेंबर रोजी पंढरपूर येथील शिवाजी चौकात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते

    आजच्या या सभेमध्ये तरुण वर्ग तसेच महिला वर्गाची मोठ्या संख्येने उपस्थिती पहावयास मिळत होती

       आज पार पडलेल्या जाहीर सभेमध्ये प्रामुख्याने अनिल सावंत यांनी केलेले भाषणामध्ये तरुण वर्गाच्या हाताला काम तसेच पंढरपूर शहर व मतदार संघामध्ये बहुसंख्यच्या संख्येने छोटे-मोठे व्यवसाय करणारे व्यवसायिक यांना कायमस्वरूपी चा आधार देण्याचे काम करणार असून मला आपल्या मत रुपी आशीर्वाद देऊन विधानसभेमध्ये पाठवा अशा प्रकारचे आव्हान अनिल सावंत यांनी मतदारांना केले.

      अनिल सावंत यांना पंढरपूर मंगळवेढा येथील मातब्बर नेत्यांच्या वाढत्या पाठिंबामुळे त्यांचा निवडून येण्याचा मार्ग सुकर झाल्याचे सर्वसामान्य नागरिकाकडून बोलले जात असून अनिल सावंत यांनाच आम्ही विधानसभेमध्ये पाठवणार असल्याचे सर्वसामान्यांच्या बोलण्यातून येत असल्याचे दिसून येत होते

           यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे जिल्हा परिषद सदस्य वसंत नाना देशमुख पंढरपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप मांडवे दीपक वाडदेकर शिवसेना महिला आघाडी ऍड पुनम ताई अभंगराव सुधीर अभंगराव संभाजी ब्रिगेडचे दीपक वाडदेकर रवींद्र मुळे दीपक चंदनशिवे इत्यादींसह मोठ्या प्रमाणावर नागरिकांची उपस्थिती असल्याचे पहावयास मिळत होते