श्रमिक पत्रकार संघ पंढरपूरची कार्यकारिणी जाहीर अध्यक्षपदी सुरेश गायकवाड तर उपाध्यक्षपदी महालिंग दुधाळे व घनश्याम शिंदे
नवक्रांती/प्रतिनिधी
श्रमिक पत्रकार संघ पंढरपूर (रजि ) या पत्रकार संघाच्या सन 2025 या नवीन वर्षाकरिता नव्याने पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम जेष्ठ पत्रकार सिद्धार्थ ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी पार पडला. यावेळी अध्यक्षपदी दैनिक पुढारीचे सुरेश गायकवाड तर कार्याध्यक्षपदी ए बी न्युज चे गणेश गायकवाड यांचेसह कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
या नवीन कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षपदी जेष्ठ पत्रकार महालिंग दुधाळे, दैनिक दिव्य मराठीचे घनशाम शिंदे यांची निवड करण्यात आली. सचिवपदी दैनिक पुण्यनगरीचे सतीश बागल, खजिनदार म्हणुन दैनिक सकाळचे सुनील कोरके, सह खजिनदारपदी दैनिक पंढरी भूषणचे सावता जाधव अशाप्रकारे निवड करण्यात आली.
या नवीन पदाधिकारी निवडीचे वेळी उपस्थितीमध्ये ज्येष्ठ पत्रकार सिद्धार्थ ढवळे,सुनील उंबरे, शिवाजी शिंदे,नवनाथ पोरे, मोहन डावरे, समाधान गायकवाड, सतीश बागल, भीमा व्यवहारे, बजरंग नागणे, सुधाकर कवडे, सूर्यकांत बनकर,शहाजी काळे, सचिन शिंदे,यांचेसह श्रमिक पत्रकार संघ पंढरपूरचे सर्व सभासद उपस्थित होते.