स्व. माजी आमदार. सुधाकरपंत परिचारक यांची चौथी पुण्यतिथी सिद्धेवाडी ग्रामस्थांनी केली साजरी.
पंढरपूर तालुक्यातील मौजे सिद्धेवाडी येथे स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात यावेळेस सिद्धेवाडी गावचे उपसरपंच लक्ष्मण गोडसे यांनी मनोगत व्यक्त करताना त्यांनी केलेल्या विकास कामाचा तसेच सहकार क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीचा आवर्जून उल्लेख करण्यात आला स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांनी संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी व गोरगरीब कष्टकरी यांच्यासाठी घालवले यावेळेस सर्जेराव जाधव सर यांनीही स्व.मा आ. सुधाकरपंत परिचारक यांनी पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्याचे काम स्व.मा आ. सुधाकरपंत परिचारक यांनी केले व या कार्यक्रमा प्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या वेळेस पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक नागनाथ शिंदे, सरपंच रोहिणी ताई जाधव, उपसरपंच लक्ष्मण गोडसे सर, रामचंद्र नाथा जाधव, धोंडीबा गोडसे सर, ग्रामपंचायत सदस्यांना रणजीत जाधव, ग्रामपंचायत सदस्य सारंग जाधव, बाबुराव गोडसे, ग्रामपंचायत सदस्य सर्जेराव जाधव सर, मधुकर आप्पा पाटील, सुरेश गोडसे ग्रामपंचायत सदस्य, बालाजी माणिक जाधव, संतोष जगन्नाथ जाधव, दिलीप पाटील, सागर जाधव, केशव फरतडे, बापू ननवरे, सुभाष जाधव, हरिदास काळे, शरद जाधव, इत्यादी सह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते