परिचारक समर्थकांना पहावी लागणार आणखी काही काळ वाट ? अपक्ष लढणार की पक्षाची उमेदवारी घेऊन या बाबत संभ्रम कायम 

परिचारक समर्थकांना पहावी लागणार आणखी काही काळ वाट ? अपक्ष लढणार की पक्षाची उमेदवारी घेऊन या बाबत संभ्रम कायम 

पंढरपूर / पांडुरंग परिवाराचे सर्वेसर्वा माजी आमदार प्रशांत परिचारक हे कोणत्या पक्षातून निवडणूक लढणार याची उत्सुकता परिचारक समर्थकांमध्ये शिगेला पोचली असून मागील सप्ताहात  मार्केट कमिटी मध्ये कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी बैठकांचे सत्र सुरु होते तर मंगळवेढा तालुक्यातही विविध गावातून बैठका घेत पांडुरंग परिवाराच्या समर्थकांच्या भावना जाणून घेतल्या जात होत्या.परंतु त्या या साऱ्या घटनाक्रमातही माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी कार्यकर्त्यांना आपण कोणत्या पक्षातून निवडणूक लढणार हे गुलदस्त्यात ठेवल्याचे दिसून आले.मागील जवळपास महिनाभरापासून परिचारक समर्थक उमेदवारी जाहीर करावी यासाठी आग्रही भूमिका घेत आले होते आणि १७ ऑगस्ट रोजी मोठ्या मालकांच्या पुण्यस्मरण अभिवादन सोहळ्यात प्रशांत परिचारक निर्णय जाहीर करतील अशीही चर्चा होत आली होती.   17 ऑगस्ट रोजी मोठ्या मालकांच्या चौथ्या पुण्यस्मरणानिमित्त वाखरी येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या विभागीय कार्यालयाच्या भव्य प्रांगणामध्ये स्वर्गीय माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्या चौथ्या पुण्यस्मरणासाठी हजारो कार्यकर्ते आले होते. कार्यकर्त्यांना उत्सुकता लागू राहिली होती की आज तरी माजी आमदार प्रशांत परिचारक कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार हे जाहीर करतील परंतु आज देखील त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी पहावयास मिळत होती. कार्यकर्त्यांचा हट्ट व परिचारक परिवारावर असणारे लोकांचे अतोनात प्रेम त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनामध्ये प्रशांत परिचारक यांनी विधानसभेची ही निवडणूक लढवावी आम्ही रात्रीचा दिवस करू व प्रशांत मालकांना निवडून आणू अशीही चर्चा कार्यकर्त्यांमधून होताना दिसून येत होती

प्रशांत परिचारक यांचे पंढरपूर शहर व मतदार संघातील 22 गावे यांच्याशी  सलोख्याचे संबंध आहेत त्याचप्रमाणे मंगळवेढा तालुक्यात ही दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून व युटोपियन शुगर च्या माध्यमातून दांडगा जनसंपर्क पहावयास मिळत आहे दामाजी  कारखाना सुस्थितीत येण्यासाठी शंभर कोटी  रुपयाचे कर्जही उपलब्ध करून दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये परिचारक यांच्या बद्दल सहानुभूतीचे वातावरण पाहावयास मिळत आहे समविचारी दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून प्रशांत परिचारक यांनी जनमानसात सहकार्याची भावना असल्याचे दिसून येत आहे पॅनलमधूनही प्रशांत परिचारक निवडणुकीसाठी उभे राहण्याचे आग्रह कार्यकर्त्यांमधून होतानाचा दिसून येत आहे 

       परिचारकांना आदरांजली वाहण्यासाठी पंढरपूर तालुक्यासह आजूबाजूच्या मोठ्या नेत्यांनी हजेरी लावल्याचे पहावयास मिळाले त्यामध्ये सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष मनोहर भाऊ डोंगरे सोयरी कॉलेजचे प्राचार्य बीपी रोंगे सर श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील मंगळाचे माजी आमदार लक्ष्मणराव ढोबळे सर धनश्री परिवाराचे व सिताराम महाराज शुगरचे मार्गदर्शक काळुंखे सर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक समाधान काळे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक बबनराव अवताडे खरेदी विक्री संघाचे सभापती सोमनाथ अवताडे जिल्हा परिषदेचे व पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक वसंत नाना देशमुख युट्युबिन शुगरचे चेअरमन उमेश परिचारक रेल्वे सल्लागार बोर्डाचे सदस्य प्रणव परिचारक इत्यादी सह हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते