लाडकी बहीण योजना वाटते बरी पण बळीराजा म्हणतोय नमो किसान सन्मान योजनेचे पैसे कधी येणार खात्यावरी ?

लाडकी बहीण योजना वाटते बरी पण बळीराजा म्हणतोय नमो किसान सन्मान योजनेचे पैसे कधी येणार खात्यावरी ?

       पंढरपूर:- महायुती सरकारने नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात सादर केलेल्या अर्थसंकल्पात  सर्वसामान्य कुटुंबासाठी कल्याणकारी योजनांची घोषणा केल्या आहेत.तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची मोठी  चर्चा होत आहे.या योजनेनुसार महिलांना दरमहा १५०० रुपये शासन देणार आहे.त्याच बरोबर शेतकऱ्यांच्या साडेसात एचपीच्या आतील वीज पंपाना मोफत वीज पुरवठा,मुलींना पदवीपर्यंतचे मोफत शिक्षण,ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थक्षेत्र दर्शन अशा घोषणा केल्या आहेत त्याच बरोबर मागील वर्षी शासनाने  75 वर्षावरील वृद्धांना मोफत एसटी प्रवास,महिलांना एसटी प्रवास भाड्यात ५० टक्के सूट अशाही योजना जाहीर केल्या होत्या.अशा अनेक योजनांचे राज्यातील सर्वसामान्य जनतेत समाधान व्यक्त केले जात असल्याचंच म्हटलं जात आहे.   परंतु राज्य शासनाने मागील अर्थसंल्पात राज्यातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर नमो किसान योजना जाहीर केली होती. तसेच या पूर्वी जाहीर झालेल्या अनेक घोषणांचा लाभ अजूनही अनेक शेतकऱ्यांना मिळाला नसल्याचंच चित्र आहे. त्यामध्ये ठिबक सिंचन वरील अनुदान गेली दोन-तीन वर्ष शेतकऱ्यांना मिळाले नाही नियमित बँकांचे कर्ज खेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी घेणाऱ्या कर्जावर 50% सबसिडी देण्याचे सरकारने जाहीर केले होते त्याचीही अंमलबजावणी होताना दिसत नाही

       तरी मायबाप सरकार कल्याणकारी योजना लोकांसाठी राबवत आहेत. त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत असतानाच दुसरीकडे नमो शेतकरी सन्मान योजनेबाबत मात्र लोकांमधून नाराजीचा सूर ऐकावयास मिळत आहे.त्याचे करणंही तसेच आहे हजारो शेतकऱ्यांना अजूनही नमो शेतकरी योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे वाटप ऑगस्ट महिना उजाडला तरी सरकारकडून झालेले नाही. पुढे पाठ मागे सपाट अशाप्रकारेच सरकारचा कारभार तर चालू नाही ना ? अशीच चर्चा आता सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये होताना दिसून येत आहे.नवीन घोषणा करण्या पूर्वी शासनाने यापूर्वी जाहीर केलेल्या योजना लोकांपर्यंत वेळेत पोहोचतात की नाही याचाही विचार सरकारने करणे आवश्यक आहे.