दि पंढरपूर मर्चेंट्स को-ऑप बँक लि., पंढरपूरच्या चेअरमन पदी श्री. शितल विद्याधर तंबोली, व्हाईस चेअरमन पदी श्री. वसंत धोंडीबा शिखरे यांची निवड
दि पंढरपूर मर्चेंट्स को-ऑप बँक लि., पंढरपूरच्या संचालक मंडळाची चेअरमन, व्हाईस चेअरमन निवडीकरिताची सभा जिल्हा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था पंढरपूर श्री. मोहन शिंदे यांचे अध्यक्षतेखाली आज गुरुवार दिनांक ०१ ऑगस्ट २०२४ रोजी देशभक्त वि.औ. तथा बाबुराव म्हमाने सभागृहात संपन्न झाली. सदर सभेमध्ये चेअरमन म्हणून श्री. शितल विद्याधर तंबोली तर व्हाईस चेअरमन म्हणून श्री. वसंत धोंडीबा शिखरे यांची एकमताने निवड करण्यात आली.
यावेळी बँकेचे संचालक सर्वश्री नागेश आण्णासाहेब भोसले, सोमनाथ सदाशिव डोंबे, राजेंद्र पवनलाल फडे विजयकुमार कांतीलाल कोठारी, भगीरथ औदुंबर म्हमाने, विजयकुमार रामचंद्र परदेशी, अमरजित राजाराम पाटील, पांडुरंग निवृत्ती शिंदे, भारत शिवदास भिंगे, सौ. मंजुश्री सुधीर भोसले, सौ. सुनंदा पदमकुमार गांधी, संजय विठ्ठल जवंजाळ, आदित्य चंद्रकलेश्वर फतेपूरकर, मारुती सुखदेव देशमुख, सुनील गंगाधर मोहिते उपस्थित होते.
यावेळी बँकेचे माजी चेअरमन सोमनाथ सदाशिव डोंबे व नागेशकाका भोसले यांचे हस्ते नुतन चेअरमन, व्हाईस चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार प्रसंगी बँकेचे सभासद सर्वश्री सुधीर शिवाजीराव भोसले, राजेश धोकटे सर, कुडूवाडी चे उदय सातव, राहुल शिंदे नाईक, आदि सभासद व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच बँकेचे व्यवस्थापक अतुल म्हमाने, उपव्यवस्थापक रमेश कुलकर्णी व सर्व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांचे आभार बँकेचे संचालक आदित्य चंद्रकलेश्वर फतेपूरकर यांनी मानले.