आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपूर एसटी आगार अचानक दिली भेट .
पंढरपूर/ प्रतिनिधी /भारताची अध्यात्मिक राजधानी असणाऱ्या दक्षिण भारताची काशी समाजाला जाणाऱ्या पंढरपूर एसटी बस स्थानकास सोमवार दिनांक 12 रोजी अचानक पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे विद्यमान आमदार समाधान आवताडे यांनी अचानक भेट देऊन बस स्थानकातील सोयी सुविधा यांचा आढावा घेतला बस स्थानकावर कचऱ्याचे ढीग साठलेले असून त्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत होती वारंवार वरिष्ठांकडे तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नव्हती तसेच स्टॅन्ड परिसरात सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने घानीचे साम्राज्य दिसून येत होते या सर्व बाबी लक्षात येताच तातडीने विद्यमान आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपूर बस स्थानकाची प्रत्यक्ष पाहणी करून अधिकाऱ्यांना प्रवाशांना जेणेकरून त्रास होऊ नये अशा सूचनाही देण्यात आल्या त्यावेळेस सोलापूर जिल्ह्याचे आगर व्यवस्थापक यांना दूरध्वनी वरून पंढरपूर बस स्थानकाकडे विशेष लक्ष द्यावे अशा प्रकारे सांगण्यात आले
पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार समाधान दादा अवताडे यांनी पंढरपूर बस स्थानक मध्ये अचानक भेट दिल्यामुळे प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले होते तरी आमदार साहेबांनी या पुढील काळात पंढरपुरातील झोपडपट्टी असेल किंवा बेघर लोकांसाठी किंवा संध्याकाळच्या वेळीफुटपाथ वर झोपणारे लोक असतील यांच्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी भावना सर्वसामान्य पंढरपूर नागरिकातून व्यक्त होताना दिसून येत आहे
यावेळी प्रांताधिकारी सचिन इथापे, साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले साहेब, पंढरपूर शहर पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके साहेब, पंढरपूर नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी सुनील वाळुंजकर, साहेब नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी श्री वाघमारे, साहेब पंढरपूर आगाराचे निरिक्षक श्री दळवी साहेब आदी उपस्थित होते.