कल्याणराव काळे यांची राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यपदी निवड करावी
कल्याणराव काळे यांची राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यपदी निवड कराव...
पंढरपूर प्रतिनिधी--
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोलापूर जिल्हयातील नेते, प्रांतिक सदस्य कल्याणराव काळे यांची राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य म्हणून निवड करा अशी मागणी शिवस्वराज्य मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सुधीर शिनगारे यांनी पत्राद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
शिवस्वराज्य मेडिकल फाउंडेशनच्या वतीने पाठवण्यात आलेल्या पत्रात कल्याणराव काळे हे गेली अनेक वर्षापासून विविध सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य व राजकीय क्षेत्रात विशेष उल्लेखनिय कार्य करीत असून पंढरपूर तालुक्यात सांगोला, मंगळवेढा, माढा,
मोहोळ या विधानसभा मतदार संघात त्यांचा निष्ठावंत कार्यकर्त्यांचा मोठा वर्ग आहे. त्यांचे मार्गदर्शनाखाली साखर कारखाना, शैक्षणिक संस्था, दुग्ध संस्था, बँक, पतसंस्था, हॉस्पिटल, नर्सिंग कॉलेज कार्यरत आहेत. अशा अनेक विविध संस्थाच्या माध्यमातून त्यांनी कार्यकर्त्यांचे मोठे जाळे तयार केलेले आहे. यापुर्वी त्यांनी विधानपरिषद, व माढा विधानसभा मतदार संघात निवडणुक लढविली होती. जिल्हयात त्यांना मानणारा निष्ठावंत कार्यकर्त्यांचा मोठा संच आहे. त्यांची निवड झाल्यास ग्रामीण व शहरी भागातील पक्षातील सर्व कार्यकर्त्यांना बळ मिळेल.
तरी राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य पदी त्यांची निवड करावी अशी मागणी करण्यात आली आहे.