जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेत श्री संत दामाजी अपंग सेवा मंडळ मंगळवेढा संचलित श्री नागनाथ मूकबधिर निवासी विद्यालय बाभूळगाव शाळेने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले
पंढरपूर /प्रतिनिधी - तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून सोलापूर येथे दि. 12/12/2024 येथे झालेल्या जिल्हा परिषद समाज कल्याण व दिव्यांग कल्याण विभागाने आयोजित केलेल्या दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत श्री. संत दामाजी अपंग सेवा मंडळ संचलित श्री. नागनाथ मूकबधिर निवासी विद्यालय बाभूळगाव विद्यालयाने घवघवीत यश संपादन करत 8 सुवर्ण.3 कांस्य व3 रोप्य पदक पटकावत स्पर्धेतील सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड जी शाळा सोलापूर येथील मैदानावर या स्पर्धा पार पडल्या. जिल्ह्यातील सर्व शाळांमधून 930 विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेत श्री नागनाथ मूकबधिर शाळेतील विद्यार्थी अर्जुन सवाशे याने 8ते12 लांब उडी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. मारुती सावंत याने 100 मीधावने स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. सागर गोरे याने 16 ते 21 वयोगटात 200 मीटर धावणे प्रथम क्रमांक मिळवला. अश्विनी दळवी 16 ते 21 वयोगटात 200 मीटर धावणे प्रथम क्रमांक मिळवला. रंजीत कोरके 16 ते 21 वयोगटात चारशे मीटर धावणे प्रथम क्रमांक मिळवला. सागर गोरे याने 16 ते 21 वयोगटात लांब उडी प्रथम क्रमांक मिळवला. वैभवी भोसले हिने 16 ते 21 वयोगटात लांब उडी प्रथम क्रमांक मिळवला. अश्विनी दळवी हिने 16 ते 21 वयोगटात चारशे मीटर धावणे प्रथम क्रमांक मिळवला. तसेच ज्ञानेश्वरी राजगुरू हिने 12 ते 16 वयोगटात लांब उडी तृतीय क्रमांक मिळवला. रितेश वायदंडे याने 16 ते 21 वयोगटात 400 मीटर धावणे तृतीय क्रमांक मिळवला. गोविंद कुरनुरे याने 12 ते 16 वयोगटात पोहणे तृतीय क्रमांक मिळवला. गौरी पडवळे येणे 16 ते 21 वयोगटात 200 मीटर धावणे द्वितीय क्रमांक मिळवला. गौरी पडोळे हिने 12 ते 16 वयोगटात द्वितीय क्रमांक मिळवला. 16 ते 21 वयोगटात 100 मीटर पोहणे द्वितीय क्रमांक मिळवला. या सर्व यशस्वी खेळाडूंना जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी सचिन कवले साहेब. वै.सा.क. शशिकांत ढेकळे साहेब. श्री संत दामाजी अपंग सेवा मंडळ मंगळवेढा संस्थेचे सचिव श्री चित्रसेन पाथरुट सर. शशी भूषण एल्गुलवार सर. श्री अरुण धोत्रे सर. यांच्या हस्ते गौरवण्यात आले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती पाथरूट मॅडम. संस्थेचे सचिव चित्रसेन पाथरुट सर. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री नागनाथ पाथरूट सर. यांनी अभिनंदन करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. सर्व यशस्वी खेळाडूंना मुख्याध्यापक श्री भोसले सर. प्रशासक श्रीखरसडे सर. कलाशिक्षक श्री बाबर सर. श्री नंदुरे सर. सूर्यवंशी मॅडम. श्री सरकुंडे सर. तसेच सर्व कर्मचारी यांनी मार्गदर्शन केले.