पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने शहरामध्ये पर्यावरण पूरक गणेश उत्सव अंतर्गत विविध ठिकाणी श्री गणेश मूर्तीची व निर्माल्य संकलन केंद्र 

पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने शहरामध्ये पर्यावरण पूरक गणेश उत्सव अंतर्गत विविध ठिकाणी श्री गणेश मूर्तीची व निर्माल्य संकलन केंद्र 

पंढरपूर शहरामध्ये घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने मोठ्या प्रमाणात प्रतिवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो याही वर्षी अनेक ठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळांनी श्री गणेशाची स्थापना केलेली आहे दिनांक १६,१७,१८/२०१४ रोजी या दिवशी शहरातील विविध गणेशोत्सव तरुण मंडळांचे व घरगुती गणपतीचे विसर्जन केले जाते प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेचे वतीने पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने प्रतिवर्षी प्रमाणे गणेश मूर्ती व निर्माल्य चे संकलन केंद्र तयार करण्यात आले आहेत ते पुढील प्रमाणे आहेत

१.अर्बन बँक प्रशासकीय इमारती समोर

२. कर्नलभोसले चौक गणेश मंदीरा समोर

३.शेटे पेट्रोल पंपासमोर

४.कॉलेज चौक बस स्टॉप जवळ

५. प्रबोधनकार ठाकरे चौक

६.सार्वजनिक बांधकाम विभाग लगत

७. स्वातंत्र्यवीर सावरकर चौक गजानन मेडीकल समोर

८.शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज चौक 

९.महात्मा फुले पुतळ्या समोर

१०.महाद्वार चौक पोलीस चौकी जवळ

११.मुक्ताबाई मठासमोर

१२.अंबाबाई पटांगण समोर विठ्ठल मोबाईल शॉपी जवळ

१३.अहिल्या पुलाजवळ पंढरपूर टेंभूर्णी रस्ता

१४.यमाई तलाव गेटजवळ टाकळी रोड संकलन केंद्र या ठिकाणी करण्यात आले आहेत या संकलन केंद्रावर ५३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे

तरी शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, नदीपात्रामध्ये गणपतीचे विसर्जन करू नये ज्यामुळे जल स्त्रोत प्रदूषित होतील हे रोखण्यासाठी ज्या ठिकाणी नगर परिषदेने गणपतीचे संकलन केंद्र उभा केलेले आहेत त्या ठिकाणी आपल्या श्री गणेशाची मूर्ती देण्यात यावी तसेच श्री गणेशाच्या मूर्ती पूजना नंतरचे निर्माल्य त्या ठिकाणीच देण्यात यावेत तसेच प्रत्येक घाटावर निर्माल्य संकलन करण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने ट्रॅक्टर उपलब्ध करून देण्यात आले आहेत त्या ठिकाणी निर्माल्य द्यावे तसेच प्रत्येक वर्षी नदीपात्रामध्ये गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी जलस्रोत प्रदूषित होऊ नये म्हणून कृत्रिम विसर्जन तलाव नदीपात्रात खड्डे घेऊन तयार करण्यात येतात परंतु यावर्षी पाऊस काळ मोठा असल्याने व नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी जास्त होत असल्याने यावर्षी नदीपात्रात कृत्रिम विसर्जन तलावाचे खड्डे घेण्यात आलेले नाहीत. असे खड्डे घेतल्यास व अचानक पाण्याची पातळी वाढल्यास एखाद्या नागरिकांच्या जीवितास धोका होण्याचा संभव नाकारता येत नाही म्हणून हा गणेशोत्सव आनंदात व पर्यावरण पूरक साजरा व्हावा व कुठलीही दुर्घटना घडू नये म्हणून नगर परिषदेने यावेळी नदीपात्रात कृत्रिम तलावाचे खड्डे घेतलेले नाहीत याची नोंद घ्यावी. मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याधिकारी अँड.सुनिल वाळूजकर,नगर अभियंता नेताजी पवार, प्रवीण बैले, आरोग्य अधिकारी शरद वाघमारे नागनाथ तोडकर पाणीपुरी अभियंता राजकुमार काळे विद्युत अभियंता राजकुमार सपाटे व संतोष लिपिक चिदानंद सर्वगोड,कृष्णात जगताप,दर्शन वेळापुरे, ऋषी अधटराव व इतर विभाग प्रमुख कर्मचारी हे या कामाचे नियोजन करीत आहेत