दिपक जाधव सर राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचे ठरले मानकरी 

दिपक जाधव सर राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचे ठरले मानकरी 

 

       पंढरपूर/ कोल्हापूरच्या नामांकित आनंदगंगा फाउंडेशन च्या वतीने 2024 चा पुरस्कार वितरण सोहळा संजय घोडावत इन्स्टिट्यूट येथे रविवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी पार पडला यावर्षी सावित्रीबाई फुले प्रशाला व जुनिअर कॉलेज सोनंद येथे 21 वर्षापासून इंग्रजी विषयाचे अध्यापन करीत असलेले योगशिक्षक दिपक कुबेर जाधव सर यांना प्रदान करण्यात आला

      आनंदगंगा फाउंडेशन कोल्हापूर यांच्या वतीने शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक कला व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला राज्यस्तरीय पुरस्कार दिला जातो. यावर्षी दीपक जाधव सरांचे संस्कृती क्षेत्रात मोलाची कामगिरी तसेच योग शिक्षक म्हणून केलेले कार्य पाहून त्यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार समारंभ पूर्वक प्रदान करण्यात आला .महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा व गोवा या राज्यातून सुमारे 250 प्रस्ताव आनंदगंगा फाउंडेशन पुरस्कार निवड समितीकडे प्राप्त झाले होते. त्यामधून निवडक 25 व्यक्तीची कामगिरीच्या आधारे निवड करण्यात आली दीपक जाधव सर हे 2003 पासून सावित्रीबाई प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सोनंद तेथे इंग्रजी उत्कृष्ट अध्यापनाचे काम करीत असून योग शिक्षणाचे धडे ही विद्यार्थ्यांना देत आहेत त्याचबरोबर उत्कृष्ट सूत्रसंचालन व्याख्याते सामाजिक कार्य पत्रकार पालक समन्वयक

      बोर्डाच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा दहावी इंग्रजी विषयाचे मॉडरेटर इत्यादी गोष्टीतील त्यांचे योगदान पाहून त्यांची निवड करण्यात आली यापूर्वी त्यांना साने गुरुजी कथामाला सोलापूर यांच्याकडून उपक्रमशील शिक्षण म्हणून गौरवण्यात आले तसेच मागील 2023 -24 सली निर्भय प्रतिष्ठान मुंबई शाखा सोलापूर यांच्याकडून जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

       सदर पुरस्कार वितरण समारंभाला अध्यक्ष म्हणून श्री माताजी मठाधिपती ओम शिवकाली मठ नरंदे कार्यक्रमाच्या प्रमुख व्याख्याता यशवंत व्यसनमुक्ती केंद्र शिराळा च्या संचालिका डॉक्टर साधना पाटील. तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी संजय घोडावत इन्स्टिट्यूट चे प्राचार्य डॉक्टर विराट गिरी यासह विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते. आनंदगंगा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर तानाजी पवार यांनी सर्व उपस्थित पुरस्कार प्राप्त शिक्षक व कुटुंबीय यांचे आभार मानले व भावी वाटचालीस शुभेच्छा ही दिल्या