निष्ठावंत मोहिते पाटील समर्थक शिष्ट मंडळ गेले शरद पवार यांच्या भेटीला .
पंढरपूर/ विधानसभेचे बिगुल वाजू लागल्याने पंढरपूर -मंगळवेढा मतदार संघातून मोहिते पाटील समर्थकांना उमेदवारी मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे हट्ट धरल्याचे दिसून येत आहे
मागील लोकसभा निवडणुकीमध्ये मोहिते पाटील यांच्यावर माढा लोकसभा व सोलापूर लोकसभा या मतदारसंघाची जबाबदारी मोहिते पाटील यांच्याकडे सोपविले होती आणि ती जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पारही पाडली हे दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून ही आले त्यामुळे येणाऱ्या विधानसभेची सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी मोहिते पाटील यांच्याकडेच दिल्याचे बोलले जाते त्यामुळे मोहिते पाटील निष्ठावंतांना संधी देतील म्हणून काल दिनांक 10 सप्टेंबर रोजी पंढरपुरातून मोहिते पाटील निष्ठावंत शिष्ट मंडळ माडाच खासदारश धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शरद पवार यांच्या भेटीला गेल्याचे समजते मागील काही दिवसापूर्वी पांडुरंग परिवाराचे नेते व जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य वसंत नाना देशमुख यांनी कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा घेण्यात आला होता या मेळाव्यात कार्यकर्त्यांचा एकच सूर पाहावयास मिळत होता पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे तिकीट कोणीही घ्या परंतु तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवा असेही कार्यकर्त्यांमधून एकच सूर निघाल्याचे पहावयास मिळत होते या कार्यकर्ता मेळाव्यासाठी मंगळवेढा तालुका व पंढरपूर तालुक्यातून मोहिते पाटील समर्थक ज्येष्ठ नेतेमंडळी व कार्यकर्त्यांनी हजेरी लावल्याचे पहावयास मिळत होते या कार्यकर्त्यांच्या हट्ट मुळेच
काल दिनांक 9 सप्टेंबर रोजी पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील मोहिते पाटील समर्थक शिष्ट मंडळ शरद पवार यांच्या भेटीला गेल्याचे बोलले जात आहे माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यामध्ये पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन तसेच खरेदी विक्री संघाचे माजी सभापती जिल्हा परिषद सदस्य वसंत नाना देशमुख पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष नागेश काका भोसले फत्तेपूरकर मेंबर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष दीपक दादा वाडदेकर भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत यावेळेस