आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपूर एसटी आगार अचानक दिली भेट .
पंढरपूर प्रतिनिधी/ भारताची अध्यात्मिक राजधानी असणारे दक्षिण भारताची काशी समजल्या जाणाऱ्या पंढरपूर एसटी बस स्थानकास सोमवार दिनांक 12 रोजी अचानक पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे विद्यमान आमदार समाधान आवताडे यांनी भेट देऊन बस स्थानकातील सोयी सुविधा यांचा आढावा घेतला बस स्थानकावर कचऱ्याचे ढीग साठलेले असून त्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत होती वारंवार वरिष्ठांकडे तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नव्हती तसेच स्टॅन्ड परिसरात सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने घानीचे साम्राज्य दिसून येत होते या सर्व बाबी लक्षात येताच विद्यमान आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपूर बस स्थानकाची प्रत्यक्ष पाहणी करून अधिकाऱ्यांना प्रवाशांना जेणेकरून त्रास होऊ नये अशा सूचनाही देण्यात आल्या त्यावेळेस सोलापूर जिल्ह्याचे आगार प्रमुख यांना दूरध्वनी वरून पंढरपूर बस स्थानकाकडे विशेष लक्ष द्यावे अशा प्रकारे सांगण्यात आले दोशी ठेकेदारावर योग्य कारवाई करावी आशा सूचना देण्यात आल्या
पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार समाधान दादा अवताडे यांनी पंढरपूर बस स्थानक मध्ये अचानक भेट दिल्यामुळे प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून येत आहे तरी आमदार साहेबांनी पंढरपुरातील झोपडपट्टी असेल किंवा बेघर लोकांसाठी किंवा संध्याकाळच्या वेळी फुटपाथ वर झोपणारे लोक असतील यांच्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी भावना सर्वसामान्य पंढरपूर नागरिकातून व्यक्त होताना दिसत आह
याप्रसंगी पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन इथापे साहेब. पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी अर्जुन भोसले साहेब. पंढरपूर पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके. साहेब पंढरपूर नगरपालिकेचे उपमुख्य अधिकारी सुनील वाळूजकर साहेब. नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी श्री वाघमारे साहेब पंढरपूर आगाराचे आगार प्रमुख श्री दळवी साहेब इत्यादी उपस्थित होते