सांगोल्यात पक्ष निरीक्षक विजय चौगुले यांच्या उपस्थितीत पार पडला शिवसेना शिंदे गटाचा मार्गदर्शन मेळावा

सांगोल्यात पक्ष निरीक्षक विजय चौगुले यांच्या उपस्थितीत पार पडला शिवसेना शिंदे गटाचा मार्गदर्शन मेळावा

सांगोला /प्रतिनिधी/ रविवार दि11 ऑगस्ट रोजी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यकर्ता मेळाव्यासाठी नवी मुंबईचे जिल्हाप्रमुख व सांगोला विधानसभा निवडणूक प्रभारी विजय चौगुले यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की सांगोला तालुक्याचे नंदनवन करण्यासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांचे मोलाचे योगदान आहे गेल्या 30 40 वर्षात जेवढी विकास कामे झाली नाही तेवढी गेल्या तीन वर्षात झालीआहेत या विकास कामाची पोहोच म्हणून आमदार शहाजी बापू पाटील यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे ते म्हणाले पुढे बोलताना ते असेही म्हणाले तुम्ही आमदार करा मंत्री आम्ही करू

    शहाजी बापू पाटील यांनी कार्यकर्त्यांना संबोध करताना म्हणाले की माझा सांगोला तालुक्यातील सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी यांच्यावर विश्वास आहे कारण गेल्या दोन-तीन वर्षात जी विकास कामे झाली ती गेल्या 40 वर्षांमध्ये झाली नाही त्यामुळे जनता माझ्या कामाला व मला कधीही विसरणार नाही आमदार शहाजी बापू पाटील याप्रसंगी असे म्हणाले की माझ्या घरात कुणीतरी आमदार होतं म्हणून मी आमदार होणार ही कल्पनाच मला आवडत नाही सर्वसामान्यांच्या प्रश्न मार्गी लागावे म्हणून तहसील कार्यालयासमोर उपोषणही केली जनतेला ज्या ज्या योजनेचे पाणी आणण्याचा शब्द दिला होता तो पूर्ण झाल्याचे समाधान ही त्यांनी कार्यकर्त्यांसमोर बोलताना व्यक्त केले 

 तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी एमआयडीसीचा प्रश्न ही लवकरच मार्गी लावणार असल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी सांगितले शेवटी बोलताना ते भाऊक होऊन म्हणाले माझ्या जीवात जीव असेपर्यंत रात्रीचा दिवस करून राहिलेली कामे मार्गी लावण्याचे आश्वासनही या प्रसंगी आमदार शहाजी बापू यांनी दिले 

     या कार्यक्रमासाठी माढा विभाग जिल्हा प्रमुख महेश चिवटे, माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ दिग्विजय पाटील धनंजय काळे दादासाहेब लवटे सागर पाटील दीपक उर्फ गुंडा दादा खटकाळे प्रतिश दिघेप्राध्यापक संजय देशमुख समीर पाटील आनंदा माने विजय शिंदे शिवाजी घेरडे मुबीना मुलानी राणी माने छाया मेटकरी अप्सरा ढोकळे कश्मीर तांबोळी ज्ञानेश्वर तेली अभिजीत नलवडे सुभाष इंगोले दादासाहेब वाघमोडे अजिंक्य शिंदे सोमेश यावलकर शिवाजीराव बाबर शिवसेना तालुकाप्रमुख पंढरपूर जगदीश पाटील धनंजय बागल सत्यवान मोरे अशोक शिंदे विजय इंगोले सुधाकर कवडे तानाजी पाटील यांच्यासह शिवसेनेचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.या मेळाव्यास सांगोला मतदार संघात समाविष्ट असलेल्या पंढरपुर तालुक्यातील भाळवणी गटातील शिवसैनिक वाहनांचा मोठा ताफा घेऊन शिवसेना शिंदे गटाचे पंढरपूर तालुका प्रमुख शिवाजी बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या संख्येने मेळाव्यासाठी सांगोल्यात आल्याचे दिसून आले.तर पक्षाच्या मेळाव्यात शिवाजी बाबर यांचा सत्कार करण्यात आला.