श्री नागनाथ मूकबधिर निवासी विद्यालय बाबुळगाव येथे 79 वा स्वातंत्र्य दिन उत्साहाने साजरा झाला .
बाबुळगाव तालुका पंढरपूर येथील श्री नागनाथ मूकबधिर निवासी विद्यालय येथे भारताचा 79 वा स्वातंत्र्य दिन हा कार्यक्रम अतिशय उत्साहाने संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्षांनी माढा विधानसभेचे आमदार श्री माननीय अभिजीत आबा पाटील यांचे बंधू श्री आनंद बापू पाटील होते तरी या कार्यक्रमासाठी पंढरपूर येथील इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष माननीय वैशालीताई काशीद सदर क्लबच्या सर्व पदाधिकारी माननीय अरहंत कोठाडिया सारिका भाभी कोठाडिया माननीय श्री गणेश गांडोळे माननीय श्री अमोल चव्हाण तसेच पालक प्रतिनिधी श्री अनिल लोखंडे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री मधुकर भोसले सर व शिक्षक शिक्षण इतर कर्मचारी होते
प्रारंभी म गांधी व संस्थेचे संस्थापक पाथरूट गुरुजी यांचे प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री आनंद बापू यांनी केले व इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा माननीय श्री सौ वैशालीताई काशीद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले
उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले विद्यालयाचे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्री महादेव खरसडे
सर यांनी विद्यालयात दिले जाणारे शिक्षण यावर आपले मनोगत व्यक्त केले विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री मधुकर भोसले सर यांनी स्वातंत्र्य दिनाची माहिती सांगितली
यावेळी संस्थेचे संस्थापक कै पाथरूड गुरुजी यांच्या जयंती व संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त केम तालुका करमाळा येथे झालेल्या विविध मैदानी क्रीडा स्पर्धेत विजय खेळाडूंच्या सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला इनरवेल क्लब च्या वतीने विद्यालयात सर्व विद्यार्थ्यांना गणवेश वाटप व शाळेस मिक्सर भेट देण्यात आला व पंढरपूर येथील शहा बुक डेपो चे मालक माननीय श्री संजय भैय्या शहा यांच्या वतीने विद्यालयात भोजना करता डायनिंग टेबल भेट देण्यात आला
यावेळी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सौ वैशाली ताई काशीद यांनी विद्यालय इनरव्हील क्लब एक वर्षासाठी दत्तक घेत असल्याचे जाहीर केले सहकार्य करण्याचे अभिवाचन दिले सौ मीराताई परिचारक यांनी या विद्यालयातील सर्व कर्मचारी काम करत असलेल्या कामाबद्दल कौतुक केले व विद्यालय शुभेच्छा दिल्या
कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री आनंद बापू पाटील यांनी स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या हा नाश थांबवा या धरती गीतावर केलेल्या अभिनयात पाहून कला शिक्षक नंदुर सर व सर्व विद्यार्थी यांचे अभिनंदन केले शाळेच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करून या शाळेसाठी येणाऱ्या रस्त्याचे काम मार्गी लावू असे अभिवाचन दिले व या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान दिले याबद्दल विद्यालयाचे आभार मानले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुनील गुजलवार सर यांनी केले तर आभार श्री बाळासाहेब खांडेकर यांनी मानले
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त पंढरपूर येथील भगीरथी सेवा आश्रम यांचे माननीय श्री दिलीप महाराज इसादकर यांच्या वतीने विद्यार्थ्यांना मिष्टांना भोजन देण्यात आले