आमदार अभिजीत पाटील यांनी दिलेला शब्द पाळला.दर सोमवारी भरवला जनता संवाद.
माढा शहरातील जिल्हा परिषद शाळेला सदिच्छा भेट
माढ्यातील क्रिडागण मैदानाची आमदार पाटील यांची अधिकाऱ्यांसोबत केली पाहणी
पंढरपूर/ प्रतिनिधी -
माढा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या रणधुमाळी मध्ये आमदार अभिजीत आबा पाटील यांनी सभेमध्ये मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जनता संवाद भरवणार असल्याचा शब्द दिला होता. त्यांनी पाळला तो शब्द खथा करत दि.२७ जानेवारी दिवशी उस्फूर्त नागरिकांच्या प्रतिसादामध्ये जनतेचे प्रश्न, तक्रारी व निवेदन सोडविण्यात आले. इथून पुढेही दर सोमवारी आमदार अभिजीत आबा पाटील यांचे जनसंपर्क कार्यालय, ग्रामीण रुग्णालय समोर, माढा येथे जनता संवादाच्या माध्यमातून मतदार संघातील जनतेच्या, शेतकऱ्यांच्या, मतदार संघातील प्रत्येक नागरिकांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेऊन त्यांचे निवारण केले आहेत.
आमदार अभिजीत पाटील यांनी सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी प्रत्येक सोमवारी सुरू केलेल्या जनता संवाद या उपक्रमाची माढा मतदारसंघातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून येणाऱ्या भविष्य कळामध्ये नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी चांगलीच मदत होणार असून या त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असताना दिसून येत आहे.