पंढरपूर मध्ये नगरसेवकांसह मोठ्या नेत्यांचा समाधान आवताडे यांना जाहीर पाठिंबा
पंढरपूर- प्रतिनिधी-पंढरपूर- मंगळवेढा विधानसभेचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार समाधान अवताडे यांना वाढता पाठिंबा मिळत असल्याचे चित्र पहावयास मिळत असून समाधान आवताडे यांनी आपल्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करावे हीच आजी माजी नगरसेवक व विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची भावना असल्याचे पहावयास मिळत असून समाधान आवताडे यांना ही निवडणूक सुकर होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र स्पष्ट होताना पहावयास मिळत आहे
दिनांक आठ नोव्हेंबर रोजी पंढरपुरातील नगरसेवक लखन चौगुले तसेच धनुभाऊ धोत्रे रामा चौगुले श्रीकांत चौगुले सह असंख्य कार्यकर्त्यांनी समाधान आवताडे यांना पाठिंबा जाहीर करून भाजपा पक्षामध्ये प्रवेश केला .
यावेळी अवताडे उद्योग समूहाचे संजय अवताडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आजी माजी नगरसेवक व विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यानी समाधान आवताडे यांना जाहीर पाठिंबा दिला असून समाधान आवताडे यांनी केलेल्या विकास कामावर आमचा पूर्ण विश्वास असून या पुढील काळात त्यांनी आमच्या भागाचा विकास करावा अशीच अपेक्षा नागरिकांमधून बोलण्यातून व्यक्त होत होती .