आजवरच्या माझ्या यशाचे श्रेय हे सर्वसामान्यांचे आहे.. एका नव्या आव्हानाचे यशात परिवर्तन करताना त्या यशाची आठवण होतेच.. त्याविषयी आपली कृतज्ञता व्यक्त करणे माझे कर्तव्य आहे. त्यासाठी काही आठवणींना आपल्यासोबत शेअर करणार आहे..... अभिजीत पाटील
एक टोळी ट्रॅक्टर ते साखर कारखाना चेअरमन या प्रवासातील यश हे आपल्या सर्वांची साथ आणि विठ्ठलाची कृपा यामुळे प्राप्त झाले, ही माझी प्रामाणिक भावना आहे.
२००७ ते २०१० पर्यंत टोळी ट्रॅक्टर प्रमुख म्हणून काम केलं. ऊस वाहतुक ट्रॅक्टरच्या सेवेत अनेक अडचणी येत असत. मला जशा अडचणी येत, तशा इतर ट्रॅक्टर मालकांना देखील येत असत. प्रस्थापित एजन्सीची वागणूक आणि ग्राहकांना गृहीत धरून वागण्याच्या वृत्तीला नाकारून, आपण स्वतः ट्रॅक्टर एजन्सीची सुरुवात केली..
त्यानंतर पुढे हॉटेल, कापड दुकान, मॉल, मल्टिप्लेक्स, पतसंस्था अशा अनेक व्यवसायांना शून्यातून पुढे आणत यशस्वीरित्या उभे केले.. या उद्योग व्यवसायांमधून आज हजारो कुटुंबांना रोजगार मिळवून देण्यात विठ्ठलाच्या कृपेने आपल्याला यश आलं..
उद्योग क्षेत्रातील यशानंतर कारखानदारी क्षेत्राचा कुठलाही वारसा, अनुभव नसताना धाडसाने, मित्रांच्या साथीने धाराशिव साखर कारखाना सुरु केला. त्यानंतर तब्बल १२ वर्षे बंद पडलेला सांगोला कारखाना ३५ दिवसांत पुन्हा आपण सुरू केला.. ४-५ कारखाने यशस्वीरित्या सुरु केल्यानंतर २ हंगाम बंद असलेला श्री विठ्ठल कारखाना देखील सुरू करुन विक्रमी गाळप करण्यात यश लाभले.
या कार्यकाळाचा एक ढोबळ आराखडा पुढील प्रमाणे सांगता येईल-
२००७ साली कारखान्यावर ट्रॅक्टरने स्वतः ऊस पोहोचविला
२०१० मध्ये सोनालिका ट्रॅक्टर एजन्सीची सुरुवात केली.
२०१४ - हॉटेल विठ्ठल कामथ, पंढरपूरची स्थापना
२०१५ - यशस्वी कांदा निर्यातदार
२०१६ - डीव्हीपी स्क्वेअर, पंढरपूर
२०१७ - धाराशिव साखर कारखाना युनिट १, धाराशिव
२०१८ - धाराशिव साखर कारखाना युनिट २, नाशिक
२०१९ - धाराशिव साखर कारखाना युनिट ३, नांदेड
२०२० - धाराशिव साखर कारखाना युनिट ४, सांगोला
२०२१ - डीव्हीपी द मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह बँक
२०२२ - धाराशिव साखर कारखाना युनिट ५, बीड
२०२२ - श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना लि.वेणूनगर गुरसाळे
२०२३ - विठ्ठल सहकारी साखर कारखाना बायो सीएनजी प्रकल्प शुभारंभ झाला.
संघर्षाने भरलेला हा सारा प्रवास निश्चितच सोपा नव्हता.. वयाच्या २३ व्या वर्षी टोळी ट्रॅक्टर ते त्याच कारखान्याचा चेअरमन हे यश आपल्या सर्वांच्या पाठिंब्याने आहे.. त्याचं श्रेय हे देखील आपल्या सर्वांचे आहे.
सर्वसामान्य कुटुंबातील माणूस ते 'कारखाना चालवणारा माणूस' हे बिरूद लोकांनी प्रेमानं बहाल करून 'विठ्ठल'ची सेवा करण्याची संधी दिली..
असामान्य घरातून भक्कम राजकीय वारसा असलेल्या प्रस्थापितांना बाजूला सारून माझ्यासारख्या सामान्य माणसाला जनतेनं चेअरमन पद बहाल केलं.. म्हणूनच ये यश जनतेचं आहे, सर्वसामान्यांचं आहे!