माढा पंढरपूर व सोलापूरसाठी अत्यंत निराशाजनक अर्थसंकल्प!. -आमदार अभिजीत पाटील..

माढा पंढरपूर व सोलापूरसाठी अत्यंत निराशाजनक अर्थसंकल्प!.  -आमदार अभिजीत पाटील..

पंढरपूर- प्रतिनिधी /अर्थसंकल्पावर पुरोगामी विचारसरणीची छाप दिसते, पण माढा, पंढरपूर व सोलापूरसाठी काय? सोलापूर जिल्ह्यासाठी एकाही मोठ्या प्रकल्पाची घोषणा नाही - ना पर्यटन, ना उद्योग, ना जलनियोजन, ना स्मारक!*

सोलापूर जिल्ह्याने महायुतीला कमी मतदान केले असले तरीही येथील जनता महाराष्ट्राचीच जनता आहे. पहिल्याच अर्थसंकल्पात हा दुजाभाव दिसेल, अशी अपेक्षा नव्हती!

राजकारण हे फक्त निवडणुकीपुरते असते, सरकार चालवताना संपूर्ण राज्याचा विचार व्हावा लागतो. मा.अजितदादा पवार असा पक्षपात करणार नाही, अशी अपेक्षा होती. पण युतीचा प्रभाव त्यांच्या अर्थसंकल्पीय मांडणीतही दिसून आला का, असा प्रश्न पडतो.

युतीने विकासापासून अशी वंचित ठेवलेली जनता पुढच्या वेळी मतदान करेल, की प्रक्षोभ वाढेल? हे वेळच ठरवेल!