*कर्तव्यदक्ष आमदार समाधान (दादा) आवताडे यांच्या रूपाने " देव आला द्यायला पण पदर नाही घ्यायला "*
*कर्तव्यदक्ष आमदार समाधान (दादा) आवताडे यांच्या रूपाने " देव आला द्यायला पण पदर नाही घ्यायला "
पंढरपूर न्यूज पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार समाधान (दादा) आवताडे यांनी पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यात विकास कामाचा धडाका लावल्याने मतदारसंघातील सर्वसामान्य जनता खुश असताना मात्र एके ठिकाणी गजब प्रकार घडल्याचे पहावयास मिळाले .
मान नदीच्या काठावर असणारे सिद्धेवाडी गावामध्ये आमदार समाधान आवताडे यांनी वेगवेगळ्या विकास कामासाठी मोठ्या प्रमाणावर निधी दिला असून त्यापैकी अंदाजे 77 लाख रुपये ची विकास कामे प्रलंबित आहेत त्या कामासाठी वर्क ऑर्डर व वेगवेगळ्या कामाची प्रोसेस पूर्ण होऊन सुद्धा ही कामे झालेली नाहीत.
गावातील राजकीय पुढाऱ्यांना याबाबत विचारले असता टोलवाटोलवीची उत्तरे देण्यात येत आहेत तरी आमदार समाधान (दादा) आवताडे यांनी या गोष्टींमध्ये लक्ष घालण्याची अपेक्षा असून विकास कामाची थांबलेली गंगा सिद्धेवाडी गावामध्ये आणावी अशी सर्वसामान्य जनतेतून बोलले जात आहे.
*संपादक*
*नवक्रांती न्यूज*
*अरुण जाधव*
*9730775373*