विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित (आबा) पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम
पंढरपूर तालुक्यात सध्या चर्चेत असलेले युवा नेते आणि विठ्ठल सह.साखर कारखान्याचे चेअरमन आपल्या कार्यकर्तृत्वावर वेगळी ओळख निर्माण करणारे तसेच कोविडच्या काळात ऑक्सिजनचा तुटवड्यावर देशात पहिला ऑक्सिजन प्रकल्प उभा करुन "ऑक्सिजन मॅन" म्हणून महाराष्ट्रात परिचित असलेले अभिजीत आबा पाटील यांचा गुरुवारी १ ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे. यानिमित्ताने आज पंढरपूर परिसरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्या गुरुवार १ ऑगस्ट त्यांचे ३९ व्या वाढदिनाचे औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये तालुक्यातील विविध गावांमधून भव्य कुस्ती मैदान , रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, महारोग्य शिबिर, डोळे तपासणी शिबिर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यकर्त्यांचे भेटी गाठीसह त्यांचा नियोजित दौरा ठरलेला आहे.
यामध्ये सकाळी ९ वाजता श्रीसंत नामदेव पायरी याठिकाणी महाआरती. सकाळी ९: ३० वाजता टेंभुर्णी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक याठिकाणी उपस्थिती. त्यानंतर सकाळी १०:३० वाजता अरण येथील सावतामाळी मंदिर येथे दर्शन, ११ वाजता माढा येथील माहेश्वरी मंदिरात दर्शन, दुपारी २ वाजता श्री विठ्ठल सह साखर कारखान्यावर कै.औदुंबर (आण्णा) पाटील यांचे पुतळ्यास अभिवादन, दुपारी ४ वाजता मंगळवेढा येथील श्री दामाजीपंत मंदिर, जय भवानी मंदिर, संत चोखामेळा समाधी, प्रवाहाबरोबर दर्गा येथे दर्शन, आणि सायंकाळी ७ वाजता पंढरपूर येथील जनसंपर्क कार्यालयामध्ये उपस्थित राहुन चेअरमन पाटील कार्पकर्ते समर्थकांचे शुभेच्छा स्विकार करणार आहेत.तरी पंढरपूर मंगळवेढा आणि माढा या दोन्ही विधानसभा मतदार संघातील कार्यक्रमांसाठी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.