मौजे फुल चिंचोली तालुका पंढरपूर येथे विविध विकास कामाचे भूमिपूजन व उद्घाटन संपन्न
मौजे फुल चिंचोली तालुका पंढरपूर येथे 31 ऑगस्ट रोजी मोहोळ तालुक्याचे आमदार यशवंत माने यांच्या अध्यक्षतेखाली विविध विकास कामांचा भूमिपूजन व उद्घाटन सोहळा संपन्न झाला यावेळेस बोलताना ते म्हणाले की कोणताही गट तट न पाहता विकास कामांना निधी दिला माझ्याकडे कोणताही माणूस आला तर त्याला रिकाम्या हाताने कधीच परत पाठवले नाही पुढे बोलताना म्हणाले की माणसाची ओळख ही नावावर नसून त्यांनी केलेल्या भरीव विकास कामामुळे होत असते अशीच कामे मी माझ्या कार्यकाळात पार पडली आहेत व यापुढेही तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी अशेच राहू द्या असेही ते याप्रसंगी बोलताना म्हणाले
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले त्यामध्ये पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती कल्याण पाटील याप्रसंगी बोलताना म्हणाले की आम्हाला पक्ष संघटना महत्वाची नसून कामाचा माणूस महत्त्वाचा आहे आणि तो यशवंत तात्याच्या स्वरूपाने आम्हाला मिळाला आहे आम्ही ज्यावेळी गावातील अडीअडचणी आमदाराकडे घेऊन गेलो त्यावेळेस त्यांनी मोकळ्या हाताने कधीच माघारी पाठवले नाही यापुढेही आम्ही आमदार यशवंत माने यांच्या पाठीशी खंबीर उभे राहू
या कार्यक्रमासाठी विठ्ठल परिवाराचे नेते विठ्ठल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष युवराज दादा पाटील पंढरपूर कृषी उत्पन्न समितीचे माजी सभापती कल्याण पाटील व्यंकटेश भालके जिल्हा दूध संघाचे दीपक माळी चिंचोली गावचे सरपंच नारायण जाधव उपसरपंच दादासाहेब प्रक्षाळे ग्रामविकास अधिकारी विकास सुरवसे इत्यादी सह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते