मोहोळचे आमदार राजू खरे यांनी केलेल्या विधानामुळे पंढरपुरातील परिचारक समर्थक आक्रमक

मोहोळचे आमदार राजू खरे यांनी केलेल्या विधानामुळे पंढरपुरातील परिचारक समर्थक आक्रमक

पंढरपूरचे माजी आमदार कर्मयोगी श्रध्देय स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या बद्दल मोहोळ विधानसभा मतदार संघातील शरद पवार गटाचे आमदार राजू खरे यांनी अनाजीपंत असे संबोधन करुन तसेच जातीवाचक अतिशय खालच्या पातळीवर विधाने केली आहेत. वास्तविक पाहता स्व.माजी आमदार कर्मयोगी श्रध्देय सुधाकरपंत परिचारक  यांनी संपुर्ण हयातभर या पंढरपूर तालुक्यातीलच नव्हे तर राज्यातील सर्वजातधी धर्मातील जनतेमध्ये  अढळ श्रध्दास्थान प्राप्त केले आहे.पांडुरंग सहकारी साखर कारखान्याची उभारणी असो अथवा बंद पडलेला भीमा सहकारी साखर कारखान्यास प्राप्त करुन दिलेेले अर्थिक वैभव असो.तसेच शहर तालुक्यातील बँका,पतसंस्था त्याच बरोबर अनेक संस्थांची उभारणी तसेच पालकत्व स्विकारून हजारो कुटुंबाना रोजगार,उदर निर्वाहाचे साधन उपलब्ध करुन दिले आहे अशा या महान स्वर्गस्थ नेत्याबद्दल,आमच्या श्रध्दा स्थानाबद्दल आमदार राजू खरे यांनी केलेेले अवमान जनक व जातीवाचक शब्दप्रयोग अतिशय निंदनिय आहेत आणि समर्थकांच्या भावना दुखावणारे आहेत.तरी सदर आमदार राजू खरे यांच्या विरोधात योग्य त्या कलमाखाली तातडीने गुन्हा दाखल करुन कारवाई करावी अशी मागणी आज पंढरपुर शहरातील माजी नगरसेवक तसेच विविध पदाधिकारी व परिचारक समर्थक यांनी पंढरपूर शहर पोलीस निंरीक्षक यांच्याकडे निवेदन देत केली.आमदार राजू खरे यांनी दोनच दिवसापूर्वी पंढरपुरातील एका सत्कार सोहळ्यात बोलताना उपरोक्त विधाने केली असा परिचारक समर्थकांचा आरोप आहे.मागील दोन दिवसापासून आमदार राजू खरे यांनी केलेल्या भाषणाची जोरदार चर्चा होत असतानाच आता त्यांच्या भाषणाबाबत हि पंढरपूर शहर व परिसरात प्रतिक्रिया उमटली आहे.