विविध कार्यकारी सोसायटीच्या व्हाईस चेअरमन पदी तरुण तडफदार सचिन घुले यांची निवड
पंढरपूर/पंढरपूर तालुक्यातील मौजे सिद्धेवाडी येथील ग्रुप ग्रामपंचायत असणाऱ्या सिद्धेवाडी गावातील विविध कार्यकारी सोसायटीच्या व्हाईस चेअरमन पदी चिचुंबे गावचे तरुण तडफदार व्यक्तिमत्व असलेले भालके गटाचे कट्टर समर्थक असणारे सचिन घुले यांची नुकतीच व्हाईस चेअरमन पदी नियुक्ती करण्यात आली या निवडीमुळे चिचुंबे व सिद्धेवाडी परिसरामध्ये आनंदाचे वातावरण पहावयास मिळत आहे
या कार्यकारी संस्थेवर भालके गटाची कित्येक वर्ष एक हाती सत्ता आहे या संस्थेचे चेअरमन विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक गोकुळ दादा जाधव हे काम पाहत आहेत लोकांनी टाकलेल्या विश्वासामुळे गट तट न पाहता लोकांची कामे केल्यामुळे गेली कित्येक ही संस्था भालके गटाकडे आहे .
या निवडी प्रसंगी संस्थेचे चेअरमन विठ्ठल चे माजी संचालक गोकुळदादा जाधव. शामराव जाधव .सदस्य सुरेश संदीपान जाधव .सदस्य हरिश्चंद्र जाधव सदस्य इंदु ताई घुले .सदस्य अनिता ताई शिखरे सदस्य. सिद्धेवाडी गावचे माजी सरपंच श्रीकांत बाबा जाधव .पप्पू यादव सरपंच ग्रामपंचायत तावशी .सुनील घुले गुरुजी.अण्णासाहेब नवले माजी ग्रामपंचायत सदस्य .विठ्ठल जाधव .लक्ष्मण घुले. अमोल जाधव .कल्याण घुले. सिद्धेश्वर नागणे माजी उपसरपंच. व संस्थेचे सचिव उमेश कुलकर्णी.
इत्यादी सह पंचक्रोशीतील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते