मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनीही केला आपला उमेदवारी अर्ज दाखल

मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनीही केला आपला उमेदवारी अर्ज दाखल

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांनी आज दिनांक 28 ऑक्टोबर रोजी सह पत्नीक आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून

   याप्रसंगी ते माध्यमांशी बोलताना म्हणाले की माझी उमेदवारी ही सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी असून तुमचे मत रुपी आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या मी रात्रीचा दिवस करून तुमचे प्रश्न मार्गी लावण्याची बांधिलकी माझी आहे सर्वसामान्य कुटुंबात जन्माला येऊन आत्तापर्यंत गोरगरिबाची सेवा केली असून यापुढेही मी तुमच्या सेवेशी  कटिबद्ध राहून निष्ठेने काम करेन आपल्या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मला भरगोस मताधिक्याने निवडून विधानसभेमध्ये पाठवा असेही यावेळेस दिलीप बापू धोत्रे यांनी आवर्जून सांगितले

     यावेळेस त्यांच्यासमवेत पंढरपूर व मंगळवेढा परिसरातील हजारो च्या संख्येने माता भगिनी व मनसैनिकांची गर्दी पहावयास मिळत होती उत्साही कार्यकर्त्याकडून दिलीप बापू तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणांचा सूर ही ऐकावयास मिळत होता