शेतकरी कष्टकरी सुशिक्षित बेरोजगार यांचे प्रश्न सोडवण्यासाठी विधानसभेमध्ये पाठवा मा. अनिल सावंत

शेतकरी कष्टकरी सुशिक्षित बेरोजगार यांचे प्रश्न सोडवण्यासाठी विधानसभेमध्ये पाठवा मा. अनिल सावंत

भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन मा अनिल सावंत यांनी सोमवार दिनांक 28 ऑक्टोबर रोजी शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मासाहेब जिजाऊ यांना वंदन करून महामानव विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून अहिल्यादेवी होळकर यांना वंदन करून भाई राऊळ अभिवादन करूनआपला उमेदवारी अर्ज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातून दाखल केला असून .

       तत्पूर्वी विठ्ठल रुक्मिणी मातेचे आशीर्वाद घेऊन नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी त्यांनी आपल्या मोजक्या शरद पवार प्रेमी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला 

याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की या मतदारसंघांमध्ये सुशिक्षित तरुणांचा प्रश्न अतिशय बिकट असून तो सोडवण्यासाठी आपला माणूस आपल्या हक्काचा माणूस म्हणून माझ्या पाठीवर मत रुपी आशीर्वाद देऊन विधानसभेमध्ये पाठवा

      याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पंढरपूर शहराध्यक्ष सुभाष भोसले राष्ट्रवादी काँग्रेस पंढरपूर तालुकाध्यक्ष संदीप मांडवे मंगळवेढा रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा इत्यादी प्रमुख नेते मंडळी उपस्थित होते