उद्योग, व्यवसाय, शेती, सहकार, सामाजिक आणि राजकीय शेत्रातील चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व : पंढरपूर - मंगळवेढ्याचे भावी आमदार अभिजीत आबा पाटील

उद्योग, व्यवसाय, शेती, सहकार, सामाजिक आणि राजकीय शेत्रातील चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व : पंढरपूर - मंगळवेढ्याचे भावी आमदार अभिजीत आबा पाटील

पंढरपूर तालुक्यातील देगाव या लहान खेड्यात (कै.) धनंजय विठ्ठल पाटील यांच्या पोटी 1 ऑगस्ट 1983 रोजी एक रत्न जन्माला आले. ते म्हणजे अभिजीत आबा पाटील. आर्थिक परिस्थिती बेताची परंतु वैचारिक श्रीमंती असलेल्या घराण्यात त्यांचा जन्म झाला. अध्यात्माचा वारसा असलेल्या पाटील घराण्याची परंपरा खूप मोठी आहे. औरंगजेबाने जेव्हा आक्रमण केले होते तेंव्हा महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देगावचे सूर्याजी पाटील यांनी त्यांच्या शेतातील विहीरीत आणि वाड्याच्या तळघरात सुरक्षित ठेवली होती. या सूर्याजी पाटील यांचे थेट वंशज म्हणजे अभिजीत आबा पाटील.

अभिजीत आबा पाटील म्हणजे

• प्रचंड जिद्द आणि चिकाटी असलेले आदर्श नेतृत्व कोरोना काळात शेकडो लोकांचे प्राण वाचविण्यासाठी परिश्रम घेतलेले नेतृत्व • सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर, कामगारयां च्या विषयी तळमळ असणारे नेतृत्व 

•चहाच्या टपरीवर बसून सामान्यांशी एकरुप होणारे नेतृत्व रात्री अपरात्री कारखान्यांवर जाऊन कामगारांशी संवाद साधून त्यांना प्रोत्साहन देणारे नेतृत्व.... दिलेला शब्द पाळणारे नेतृत्व.... भावी आमदार म्हणून जनतेच्या मनात आपुलकीचे स्थान निर्माण केलेले नेतृत्व.... अहोरात्र काम करणारे, उत्साही आणि आशादायी नेतृत्व.... प्रत्येकाशी आपलेपणाने बोलून त्याला मदत करण्याची भूमिका घेणारे आश्वासक नेतृत्व.. • भविष्याचा वेध घेऊन पंढरपूर आणि मंगळवेढ्याच्या विकासासाठी जिद्दीने काम करत असलेले नेतृत्व

रंजन आणि प्रबोधन -

कारखानदारी करीत असतानाच कार्यक्षेत्रातील शेतकरी बांधव आणि नागरिकांचे रंजनातून प्रबोधन करण्याचे कार्य अविरतपणे सुरू आहे. आजवर शिवपूत्र संभाजी हे महानाट्य, शिव महापुराण कथा, महिलांसाठी खेळ पैठणींचा, व्याख्यानमाला, दिवाळी फराळ, दांडिया स्पर्धा या उपक्रमातून रंजन आणि प्रबोधन करण्यात आले आहे.

जनसामान्यांचा आधारवड.....

माणसाच्या एकूण जीवनप्रवासात त्याच्या हातून घडणाऱ्या चांगल्या कार्याची गोळा बेरीज ही त्या माणसाच्या आयुष्याची किंमत असते. अशा माणसाची सुरुवात कुठून झाली हे महत्वाचे नसते. तर तो कुठे पोहोचला हे महत्वाचे असते.

एका साखर कारखान्यावर ऊस तोडणी वाहतूक करणाऱ्या वाहनाचा मालक, हा पुढे जाऊन त्याच साखर कारखान्याचा लोकनियुक्त चेअरमन होऊ शकतो. हे अविश्वसनीय आणि दुर्मिळ उदाहरण म्हणजे अभिजित आबा पाटील होत.

सुमारे आठ दशकांचा इतिहास असलेल्या महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखानदारीत आणि महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रातील हे एकमेव उदाहरण असेल. अवघ्या चाळीशीत असलेले हे नेतृत्व सोलापूर जिल्ह्यातील युवकांचे आकर्षण बनले आहे. पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यात सक्षम नेतृत्वाची निर्माण झालेली पोकळी अभिजीत आबा पाटील यांच्या रुपाने भरुन निघाली आहे. आणि हे सत्य तीन वर्षांपूर्वी तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायतींच्या, साखर कारखान्याच्या निवडणूकीतून तसेच लोकसभा निवडणुकीतही अधोरेखित झाले आहे. काय आहे आणि काय असावे याचे मर्म कळालेला युवा नेता अभिजीत आबा पंढरपूर मंगळवेढा या तालुक्यांचे नंदनवन करणार याची खात्री आता समाजमनाला पटली आहे. साखर कारखानदारीतील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणारा महाराष्ट्रातील एकमेव तरुण चेअरमन म्हणजे अभिजीत पाटील आहेत, असे गौरवोदगार देशाचे नेते शरदचंद्रजी पवारसाहेब यांनी काढले होते. आपल्या कतृत्वाचा ठसा लहानवयातच उमटविण्यात यशस्वी झाल्यामुळे अभिजीत आबांना कारखाना चालवणारा माणूस, ऑक्सीजन मॅन, महाराष्ट्राचा महाब्रेड, भावी आमदार अशा बिरुदावल्या मिळाल्या आहेत. जे दुर्मिळ आहे ते मिळवायचं, जे मिळालेलं आहे ते सुरक्षित ठेवायचं, जे सुरक्षित ठेवण्याजोगे आहे ते वृध्दींगत करायचे आणि जे वृध्दींगत केले आहे त्याचा योग्य ठिकाणी वापर करायचा ही त्यांच्या विचाराची मूस आहे. आज तालुक्यातील जनतेसाठी चोवीस तास उपलब्ध असलेला नेता म्हणून अभिजीत आबांकडे पाहिले जाते.

चला उद्योजक घडवू या, अशा अभियानातून अभिजीत आबा युवकांचे प्रबोधन करतात. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक युवा संग्रह असलेला नेता म्हणून अभिजीत पाटील नावारुपास आलेले आहेत. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे, या न्यायाने अभिजीत आबा अनेक क्षेत्रात यशस्वी ठरले आहेत. व्यवसाय करताना केवळ पैश्याचाच विचार करायचा नसतो तर सामाजिक बांधिलकीचे भान आणि लोककल्याणाची तळमळ आवश्यक असते. हा विचार घेऊन काम करणाऱ्या अभिजीत आबांची समाजातील शेवटच्या घटका पर्यंत पोहचण्याची हातोटी, सचोटी आणि कसोटी खरोखरच कौतुकास्पद आहे.

पॉवर पंच

प्रामाणिक भूमिका, सामान्यांच्या विषयी जिव्हाळा आणि प्रेमाची भावना असलेले नेतृत्व म्हणून सामान्य जनता अभिजीत आबांना ओळखू लागली आहे. त्यामुळे आगामी काळ अभिजीत आबांचा असणार असल्याने आता पासूनच सामान्य जनता त्यांच्या कडे भावी आमदार म्हणून पहात आहे. अभिजीत आबांची सामान्य जनतेशी असलेली बांधिलकी आणि त्यांच्या कामाचा हुरुप पहाता ते आमदार होणार हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची गरज नाही.

साखर कारखानदारी....

साखर उद्योग हा महाराष्ट्राचा प्राण आहे. या उद्योगात पाऊल टाकण्याचे धाडस आणि त्यामध्ये अभिजीत पाटील यांना मिळालेले यश हा कौतुकाचा, आश्चर्याचा आणि संशोधनाचा विषय आहे. अनेक वर्षे बंद असलेले साखर कारखाने त्यांनी आपल्या अथक परिश्रमाने, जिद्दीने आणि चिकाटीने चालू करुन अल्पावधीत कतृत्व सिध्द केले

2017 मध्ये बारा वर्षे बंद असलेला धाराशीव साखर कारखाना आणि 2018 मध्ये नाशिक येथील देवळा साखर कारखाना हे बंद असलेले साखर कारखाने अभिजीत आबा पाटील यांनी यशस्वीरित्या चालू करुन दाखवले आणि तेथील शेतकऱ्यांना न्याय दिला. पुढे 2019 मध्ये लगेच नांदेड येथील साखर कारखाना विकत घेऊन तो ही यशस्वीरित्या चालू केला. अभिजीत आबांच्या या प्रयत्नांमुळे उद्योग व्यवसायाला चालना मिळत गेली आणि त्यांचा आत्मविश्वास दुणावला.

कष्टाच्या चिखलातून उमलणारे ज्ञानाचे कमळ जीवन सुगंधीत करते. त्याप्रमाणे अभिजीत आबा पाटील यांनी रात्रन दिवस साखर कारखानदारीचा सखोल अभ्यास केला. चिंतन केले. अत्याधुनिक मशीनरी व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ अशा अनेक महत्वाच्या विषयांवर त्यांनी योग्य निर्णय घेत यशाची कमान आणखी वाढवली. धाराशीव साखर कारखान्यात इथेनॉल निर्मिती प्रकल्प उभारला आणि कारखान्याचा आर्थिक स्तर आणखी उंचावला. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक ऊसाचा भाव विठ्ठल कारखान्याच्या माध्यमातून दिला जातो.

राजकीय क्षितिज प्रकाशमान करणारा तारा

पंढरपूर तालुक्यात गेल्या चार वर्षात प्रचंड उलथापालथ झाली असून तालुक्यातील जनता प्रस्थापित नेतृत्वास पर्याय शोधत होती. याच अस्वस्थ आणि झाकोळून गेलेल्या पंढरपूरच्या राजकीय क्षितिजाला उजळून टाकणारा, प्रकाशमान करणारा तारा म्हून अभिजित पाटील यांच्याकडे पाहिले जाते. अतिशय अल्प काळात आबांनी पंढरपूरच्या राजकीय क्षेत्रांत आपले मजबूत स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या राजकीय प्रभावाची दखल म्हणूनच राज्यातील सर्वोच्च नेत्यांकडूनही घेतली गेलेली आहे.

ऑक्सीजन मॅन....

कोरोना काळात देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांनी महाराष्ट्रातील साखर कारखानदारांना ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प सुरु करण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी त्यांच्या आवाहनाला तातडीने प्रतिसाद देत तंत्रज्ञांना बोलवून त्यांच्या सोबत अहोरात्र थांबून आबांनी धाराशिव कारखान्यात अवघ्या काही दिवसात ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प यशस्वी केला. त्यामुळे शेकडो लोकांचे प्राण वाचण्यास मदत झाली. राज्यातील सर्व नेतेमंडळींनी तर आबांच्या कार्याचा गौरव केलाच परंतु देशपातळीवर देखील आबांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

सामाजिक सलोख्याचा सेतू बांधणारा नेता

पंढरपूरची राजकीय, सामाजिक पार्श्वभूमी हि सर्व धर्म समभावाची आहे, सामाजिक सलोखा हीच तर वारकरी सांप्रदायची पायाभरणी आहे. याच सामाजिक सलोख्याचे, समतेचे संस्कार झालेल्या अभिजित पाटील यांच्याकडून नेहमी सामाजिक सलोखा जपण्याचा प्रयत्न झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे, क्रांतिसूर्य महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा जागर अभिजित आबांकडून करण्यात येतो. त्याच बरोबर मुस्लिम समाजबांधवांच्या धार्मिक सण, परंपरा यांच्यामध्ये आबांचा सहभाग तुका म्हणे झरा मूळचाच आहे खरा, या सहजतेने असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अभिजित आबा सर्व स्तरातील आणि सर्व जाती धर्मातील आबालवृद्धांना, माता भगिनींनीच आपलेसे वाटणारे नेतृत्व आहे हे सिद्ध झालेले आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या विठ्ठल महाविद्यालयाचा यंदाचा बारावीचा निकाल ९७ टक्के लागला आहे. भविष्यातील वेध घेऊन पुणे-मुंबईसारख्या प्रशाला व महाविद्यालयाचे ज्ञानदानाचे कार्य सुरू ठेवण्याचा प्रयत्न होत आहे

आजारी साखर कारखानदारीचा डॉक्टर

अभिजित पाटील यांच्या एकूणच वाटचालीचे वर्णन करायचे झाल्यास आजारी साखर कारखानदारीचे डॉक्टर असे करता येईल, धाराशिव, वसंतदादा पाटील सहकारी नाशिक आणि नांदेड येथील व्यंकटेश्वरा, सांगोला शेतकरी सहकारी साखर कारखाने चालवण्यास घेतले आणि यशस्वी चालवून दाखवले. यातील सांगोला साखर कारखाना १२ वर्षे बंद होता तो दोन करून तिसरा हंगाम गत वर्षी पार केला. तर विठ्ठल सहकारी साखर कारखाना कर्जात बुडाल्याने बंद पडलेला असताना सभासदांनी मोठ्या विश्वासाने तो अभिजित आबा कडे दिला. आबांनी सभासदांचा विश्वास सार्थ ठरवताना दोन वर्षे कारखाना यशस्वी चालवला आहे. 

चेअरमनपदाची सूत्रे हाती घेताच पहिल्या ७ लाख २६ हजार टन तर दुसऱ्या वर्षी विक्रमी १० लाख ८० हजार टन उसाचे गाळप केले. शेतकऱ्यांना विक्रमी भाव दिला. जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी फोडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रथमच ३ हजार रुपये प्रतिटन दर दिला. त्यामुळे वयाच्या चाळीशीत असतानाच अभिजित आबा यांनी आजारी साखर कारखान्याचे डॉक्टर अशी उपाधी मिळवली आहे. आता बायो सीएनजी प्रकल्पाची उभारणी वेगात सुरू असून हा प्रकल्प लवकरच कार्यान्वित केला जाईल.

कठीण समयी धैर्याने उभा राहणारे

धाडसी, कल्पक, चतुरस्त्र नेतृत्व आबांनी अल्पावधीत निर्माण केलेले साम्राज्य पाहून प्रस्थापितांचे डोळे दिपतात आणि अधून मधून आबांच्या वाटचालीत अडथळे निर्माण करण्याचे, संकटे उभा करण्याचे प्रयत्न केले जातात. मागील तीन वर्षात आलेल्या अशा संकट काळात अभिजित आबा मोठ्या धैर्याने उभा राहिले आहेत. छत्रपतींचा गनिमी कावा, त्यांचे कल्पक आणि धाडसी नेतृत्व कौशल्य आबांनी अनुकरणीय मानून त्याच पद्धतीने आबा संकटाना सामोरे गेले आहेत. ते स्वतः कधी डगमगले नाहीत कि सहकाऱ्यांचाही धीर खचू दिलेला नाही, संकटात संधी शोधून त्यावर मात करण्यात आबा यशस्वी झालेले आहेत. त्यामुळे आबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन त्यांच्या पाठीशी उभा राहणारे मावळे एक इंच हि मागे सरलेले नाहीत. त्यामुळेच आबांचे आणि त्यांच्या सोबत असलेल्या सहकाऱ्यांचे राजकीय, आर्थिक, सामाजिक, सार्वजनिक हित अबाधित असल्याचा विश्वास दिसून येतो.