वाढदिवसानिमित्त संयमी आणि शांत स्वभावाचे घडले दर्शन

वाढदिवसानिमित्त संयमी आणि शांत स्वभावाचे घडले दर्शन

          पंढरपूर तालुक्यातील मौजे एकलासपूर येथे सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे संचालक योगेश ताड यांचा वाढदिवस बुधवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी सायंकाळी एकलासपूर येथे साजरा करण्यात आला यावेळी एकलासपूर व परिसरातील हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती पहावयास मिळाली

     संचालक  योगेश ताड यांना शुभेच्छा देण्यासाठी सहकार शिरोमणी कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ दादा भालके धनश्री परिवाराचे व सिताराम महाराज सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक शिवाजीराव काळुंखे सर जिल्हा परिषद सदस्य वसंत नाना देशमुख प्रणव परिचारक ऍड तानाजीराव सरदार जयसिंग नाना देशमुख इत्यादी सह अनेक मान्यवर तसेच मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यातील असंख्य हितचिंतक व नातेवाईक शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते 

      या कार्यक्रमाचे औचित्य साधून योगेश ताड यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घघाटन धनश्री परिवाराचे संस्थापक शिवाजीराव साळुंखे सर यांच्या शुभहस्ते फित कापून  करण्यात आले