मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल (रॉकी) बंगाळे यांच्याही नावाची चर्चा

मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल (रॉकी) बंगाळे यांच्याही नावाची चर्चा

विधानसभेचे बिगुल वाजत असतानाच मोहोळ विधानसभा मतदार संघा मध्ये महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षातून तिकीट मिळवण्यासाठी इच्छुकांची गर्दी होत असल्याचे पहावयास मिळत आहे

काही महिन्यापूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोहोळ तालुक्यातून काँग्रेसचे उमेदवार प्रणिती ताई शिंदे यांना पन्नास हजाराचे मताधिक्य देऊन मोहोळ तालुक्याचा कल हा महाविकास आघाडीच्या बाजूने दिसून येत आहे त्यामुळे देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे मोहोळ विधानसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुकांची गर्दी ही पहावयास मिळत आहे

त्यातच भर पडली म्हणजे अमोल (रॉकी) बंगाळे या नावाची अमोल (रॉकी) बंगाळे हे बऱ्याच वर्षापासून राजकीय समाजसेवेचे काम करीत असून त्यांचाही दांडगा जनसंपर्क असल्याचे पहावयास मिळत आहे त्यांनी गाव भेट दौऱ्यावर जोर दिला असून सर्वसामान्य नागरिकांतून व तरुण वर्गामधून तुम्हालाच उमेदवारी मिळावी अशी आग्रही मागणी ही होत असल्याचे पहावयास मिळत आहे

त्यातच मागील काही दिवसापूर्वी अमोल बंगाळे यांनी शरद पवार यांची भेट ही घेतल्याचे समजते शरद पवार यांच्याकडून त्यांना उमेदवारीसाठी हिरवा कंदील दाखवल्याचे बोलले जात असून भविष्यात चळवळीतला राजकीय व समाजसेवेची आवड असणाऱ्या अमोल बंगाळे (रॉकी) यांना उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे