मा. अनिल सावंत यांना जनतेतून मिळतोय उस्फूर्त प्रतिसाद
पंढरपूर प्रतिनिधी/पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार मा. अनिल सावंत यांच्या प्रचाराचा झंजावात मंगळवेढा तालुक्यात सूरू झाला असून या प्रचार सभेसाठी प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असून मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी झाल्याचे पहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे या प्रचार सभेमध्ये तरुण वर्गांचा समावेश मोठ्या प्रमाणावर असल्याचे चित्र दिसून येत असून अनिल सावंत यांना जनतेतून मिळणाऱ्या उस्फुर्त पाठिंब्यामुळे त्यांचा निवडून येण्याचा मार्ग सुखकर झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. दिनांक 10 नोव्हेंबर रोजी मंगळवेढा तालुक्यातील ममदाबाद येथे झालेल्या प्रचार सभेमध्ये बोलताना अनिल सावंत म्हणाले की मतदान रुपी आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या मी तुम्ही केलेल्या सहकार्याची परतफेड कामाच्या माध्यमातून करतो लोकप्रतिनिधी नसतानाही मी आजवर वेगवेगळ्या कामाच्या माध्यमातून आपली सेवा केली आहे यापुढे अशीच सेवा करण्याची संधी मला द्या असेही ते बोलताना म्हणाले