मोहिते पाटलांवरील वर्षानुवर्षाची निष्ठा वसंत नाना देशमुख यांना देणार विधानसभेसाठी संधी

मोहिते पाटलांवरील वर्षानुवर्षाची निष्ठा वसंत नाना देशमुख यांना देणार विधानसभेसाठी संधी

पंढरपूर/ पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे बिगुल वाजत असतानाच मोहिते पाटील कार्यावर गेली कित्येक वर्ष निष्ठा असणारे पंढरपूर तालुक्यातील लोकप्रिय व्यक्तिमत्व वसंत नाना देशमुख यांनाही विधानसभेची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता राजकीय क्षेत्रात होत आहे गेली 30-40 वर्ष पांडुरंग परिवाराच्या माध्यमातून वसंत नाना देशमुख यांनी आपल्या राजकीय क्षेत्रात कार्याचा ठसा सर्वसामान्य लोकांमध्ये उमटविला आहे 

      नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून जिल्ह्याच्या राजकारणाला एक वेगळी दिशा देण्याचे काम मोहिते पाटील यांनी केले त्यांनी माढा लोकसभा तसेच सोलापूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी ही मोहिते पाटील यांनी घेतली होती आणि ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्यात मोहिते पाटील यांना मोठे यश ही प्राप्त झाले त्यांनी दोन्ही जागा मोठ्या मताधिक्याने जिंकूनही आणल्या जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळावर मोहिते पाटील यांनी त्यांचे वर्चस्व सिद्ध करून दाखवले म्हणूनच देशाचे नेते शरद पवार साहेब यांनी यावेळेस विधानसभेची जबाबदारी ही मोहिते पाटील यांच्याकडे सोपविल्याचे दिसून येत आहे त्याचाच एक भाग म्हणून जे मोहिते पाटील निष्ठावंत आहेत त्यांनाच विधानसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे यामध्ये मंगळवेढा अर्बन बँकेचे चेअरमन राहुल शहा हेही मोहिते पाटील समर्थक असल्याचे बोलले जात आहे तसेच पंढरपुरातून माजी उपनगराध्यक्ष नागेश काका भोसले यांच्याही नावाची चर्चा होत असल्याचे दिसून येत आहे परंतु जरी मोहिते पाटील समर्थकांमधून तिन्ही नावे आघाडीवर असली तरी मोहिते पाटील ज्या नावावर शिक्कामोर्तब करतील त्यांच्या मागे आम्ही प्रामाणिकपणे उभे राहून त्यांना निवडून आणू असेही माजी उपनगराध्यक्ष नागेश काका भोसले यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले

              पंढरपुर तालुक्याच्या राजकारणात वसंत नाना देशमुख यांची प्रतिमा एक निष्कलंक व्यक्तिमत्व अशी राहिली आहे.अकलूजकर मोहिते पाटील परिवार आणि कासेगावकर वसंतनाना देशमुख यांच्यात मागील अनेक दशकापासून घनिष्ठ स्नेहाचे संबंध राहिले आहेत.यातूनच १९९० च्या दशकात विजय प्रताप युवा मंचच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबबाबदारीही मोहिते पाटील यांनी वसंत नानादेशमुख यांच्यावर सोपविली होती.वसंत नाना देशमुख यांना पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदाची संधी द्यावी अशी मागणीही त्यांच्या समर्थकांकडून अनेक वेळा पुढे आली होती.परंतु संधी मिळाली नाही.वसंतनाना देशमुख समर्थकांनी कासेगाव येथे बोलावलेल्या बैठकीत आपण जो निर्णय घ्याल त्यास आमचा पाठींबा राहील अशी भूमिका मांडली गेल्याचे दिसून आले. विचार विनिमय बैठकीसाठी पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन वसंत नाना देशमुख यांच्या समर्थकांनी कासेगाव तालुका पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीस समर्थकांचे मनोगते जाणून घेण्यात आली.

यावेळी पंढरपूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, माजी नगरसेवक सुरेश नेहतराव, मोहम्मद उस्ताद, दीपक दादा वाडदेकर, हंसराज देशमुख यांच्यासह पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील विविध आजी-माजी पदाधिकारी, तसेच वसंत नाना देशमुख यांना विधानसभेच्या उमेदवारीसाठी पाठिंबा देण्यासाठी प्रचंड मोठा संख्येने जनसमुदाय उपस्थित असलेले दिसून आले.